spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

लोकप्रियता लक्षात घेवून Eknath Shinde यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळेल: Abdul Sattar

Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले असले तरीही मुख्यमंत्री मात्र कोण होणार हे अजून जाहीर झाले नाही. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा हा उद्या (सोमवार, २५ नोव्हेंबर) होणार असल्याचं महायुतीकडून जाहीर करण्यात आले आहे. अश्यातच आता शिवसेना (Shivsena) आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मुख्यमंत्रीपदावरून मोठे भाष्य केले आहे.

अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षाचा कार्यकाळ शेतकरी, मोलमजूर गोरगरीब प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. ही जी निवडणूक झाली त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी आशा आहे. भाजप देशात, राज्यात आमचे मोठे भाऊ आहेत, त्यांनी छोट्या भावानी चांगली कामगिरी केली. त्यांची लोकप्रियता लक्षात घेवून जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे याचं सर्वेमधील देखील त्यांचं नाव आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे मराठवाड्याला नक्की झुकतं माफ देतील. सर्वसामान्य जनता कार्यकर्ते यांचा इच्छा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत

ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीकडे भीक मागत होते. त्यांनी आत्मपरिक्षण करावं यासाठी त्यांच्याकडे आत्मादेखील राहिला नाही,” अशी सडकून टीका देखील त्यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

२५ नोव्हेंबरला शपथ घेणार नवे मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या अभूतपूर्व विजयानंतर राज्यभरात महायुतीचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत. राज्यातील आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकांपैकी भाजपला ऐतिहासिक असे तापर्यंतचे सर्वात मोठे यश प्राप्त झाले आहे. दुसरीकडे मात्र लोकसभा निवडणुकीत राज्यात दमदार कामगीरी करूनसुद्धा महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला ५० चा एकदा गाठणेही कठीण झाल्याचं पाहायला मिळालं. महायुतीने मात्र २८८ पैकी २३६ जागांवर विजय मिळवला. आता महायुतीच्या विजायानंतर पुढील मुख्यमंत्री कोण? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्या शपथविधी सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. २६ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यामुले एक दिवस आधीच सरकार स्थापन केले जाणार असल्याचं समजत आहे.

हे ही वाचा:

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: मुंबईतील विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss