spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

खडसेंना डोळे जरी लावले तरी मी दिसतो, खडसेंच्या आरोपांवर Chandrakant Patil यांचे प्रतिउत्तर

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालेली पाहायला दिसत आहे. तसेच निवडणुकांचा रणसंग्रामही आता जोरदार सुरू झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीकाटिपण्ण्या करतायेत. सर्व पक्षाकडून राजकीय नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहेत. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शिवसेना शिंदेगटाचे (Shivsena) विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर टीका केली आहे. यावर आता नवा राजकीय वाद चालू झाला असून चंद्रकांत पाटील यांनीही यावर प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधत चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. ‘चंदू पाटलाला मत दिलं तर गल्लोगल्ली गावोगावी गुंडगिरी वाढेल,’ असे वक्तव्य करत गावोगावी गुंड पोसले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावर प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर प्रत्येकाला फोन करून धमक्या देत असल्याचा आरोप केला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“एकनाथ खडसे यांना जळी स्थळी काष्टी पाषाणी चंद्रकांत पाटील दिसायला लागलेले आहेत, खडसेंना डोळे जरी लावले तरी मी दिसतो, दिल्लीचे नेतृत्व महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या माणसाने कालपर्यंत खूप मोठ्या गप्पा मारल्या, तो माणूस आज गल्ली गल्ली फिरतोय आणि प्रत्येकाला फोन करून धमक्या देतोय,”असा गंभीर आरोप मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावरती केला आहे.

ते पुढे म्हणाले, “खडसे 30 वर्षापासून खोटं बोलणारी मंडळी आहे, तुमची बोलण्याची पद्धत तुमची बोलण्याची लँग्वेज किती चांगली आहे सगळ्यांना माहित आहे तुमची विधानसभेची जर भाषण काढून पाहिली तर सर्वांना समजेल, तुम्ही सुसंस्कृत असल्याने 2019 मध्ये लोकांनी तुम्हाला जागा दाखवली आहे, आता 2024 ची सुद्धा तीच गत होणार आहे यात काही शंका नाही, चंद्रकांत पाटील नावाचा सामान्य माणूस आमदार झाल्याचे तुम्हाला खूप मोठे दुःख आणि शैल्य आहे.”

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss