spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत याकरिता शिवसेना शिंदे गटाकडून गजानन महाराजांना साकड

Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले असले तरीही मुख्यमंत्री मात्र कोण होणार हे अजून जाहीर झाले नाही. अश्यातच काल (बुधवार, २७ नोव्हेंबर) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्याचे संकेत दिले असून केंद्राद्वारे जो निर्णय घेण्यात येईल तो मान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. असे असले तरीही शिवसैनिकांमध्ये मात्र एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आग्रही असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू असून शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आज बुलढाण्यातील विष्णूवाडी परिसरात असलेल्या गजानन महाराज मंदिरात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संत श्री गजानन महाराजांना साकड घातले आहे.

यावेळी आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत या भावनेपोटी आम्ही गजानन महाराजांना साकडं घातलं आहे. शेतकरी लाडक्या बहिणी या सगळ्यांनी एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री या राज्याची धुरा सांभाळावी. भाजपचा मुख्यमंत्री होईल असं एकनाथ शिंदे हे काही बोलले नाही. मी पत्रकार परिषद पूर्ण पाहिली. त्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सांगितलं की शिवसेना आपल्या पाठीशी आहे. जो निर्णय तुम्ही घ्याल तो आम्हाला मान्य आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. आणि म्हणून आमची गजानन महाराज, अमित शहा यांना आणि नरेंद्र मोदींना निश्चितच ही शक्ती देतील त्यांच्या मुखात न आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचं नाव मुख्यमंत्री म्हणून येईल.तर सहा महिने आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर फार फुलक्या मारल्या आम्ही जिंकलो जिंकलो म्हणून.. सहा महिन्यातच सगळ्या मशीन बिघडल्यात का? आता बुलढाणा 800 मताचा फरक राहिला फक्त मग इथेही evm मशीन खराब होती का? तिकडे आदित्य ठाकरे जिंकतो किंवा त्यांचे 16 येतात मग कोणीच आलं नसतं. यांनी पराभव मान्य केला पाहिजे.. रडणं सोडलं पाहिजे यांना जनतेने नाकारलेलं आहे एकनाथ शिंदेंचा नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केलेला आहे हा परिणाम त्याचा आहे एवढ्या जागा या ठिकाणी आलेले आहेत.”

पत्रकार परिषदेत शिंदेंनी सोडला मुख्यमंत्रीपदाचा दावा?

एकनाथ शिंदे यांनी बोलताना मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत दिले. पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी समारोपाची भाषा केली. “सगळ्या पदांपेक्षा लाडक्या बहिणींचा ‘सख्खा लाडका भाऊ’ हे पद माझ्यासाठी महत्वाचं असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सत्तास्थापन करताना माझी अडचण होणार नाही. मी काहीही ताणून ठेवलेलं नाही. काल मी नरेंद्र मोदी आणि अमित शहांना फोन केला होता. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार,” असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

“राज्यात पायाला भिंगरी लावून फिरलो. मी सामान्य कुटुंबातून आलोय. मी कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता होतो आणि कार्यकर्ता राहणार. सर्व घटकांसाठी आम्ही काम करतोय. अनेक प्रकल्प आणि कल्याणकारी योजना राबवल्या. बाळासाहेबांचे विचार आणि दिघेसाहेबांची शिकवण घेऊन पुढे गेलो. अडीच वर्ष पंतप्रधान मोदी आणि अमित शहा पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं, हे महत्त्वाचं आहे. जनतेचं प्रेम मिळालं, सर्वांना मी जवळचा वाटलो. जनतेने मला आपलंस केलं. लोकप्रियतेमध्ये मी वरचढ चढलो ते फक्त जनतेमुळे. मी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम केलं. अडीच वर्षाच्या काळात केंद्र सरकार माझ्या पाठीशी उभं होतं. केंद्राने निधी दिला म्हणून सर्व सोयीने होऊ शकलं. आमच्यात कसलाही अडसर नाही,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

शिंदे गटातील प्रबळ दावेदार Devendra Fadnavis यांच्या भेटीला…

Eknath Shinde यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पालकमंत्री ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss