spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

Shivsena UBT: मराठीचा अपमान,औरंगजेबाचा गौरव वाढत्या ढोंगाची निर्मिती; ठाकरे गटाकडून टीका

ठाकरे गटाने भाजप आणि संघाच्या नेत्यांनी मराठी भाषेचा केलेल्या अपमानावर आणि औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भैयाजी जोशी यांच्या मुंबईची भाषा मराठी नाही या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. यावर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या रोकठोक मधून टीका करण्यात आली आहे.

Shivsena UBT: ठाकरे गटाने भाजप आणि संघाच्या नेत्यांनी मराठी भाषेचा केलेल्या अपमानावर आणि औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भैयाजी जोशी यांच्या मुंबईची भाषा मराठी नाही या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. यावर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या रोकठोक मधून टीका करण्यात आली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सामना वृत्तपत्राचे मुख्य संपादक आहेत. त्यांनी सामानातून मांडलेले विचार हे ठाकरे गटाचे च असतात असे बोलले जाते. नुकताच त्यांच्या वृत्तपत्राच्या रोकठोक या सदरातून सध्या सुरु असलेल्या अनेक मुद्द्यांवरून शिंदे व भाजप सरकार वर टीका करण्यात आली आहे. “आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत,” असे सांगणारे एकनाथ शिंदे व त्यांचे लोकही औरंगजेबाचा गौरव होताना आणि मराठीवर हल्ले सुरू असताना षंढासारखे शांत राहिले, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. भैयाजी जोशी यांनी मुंबईत येऊन केलेले विधान लखनऊवरून आलेल्या समाजवादी पार्टीच्या नेत्याने किंवा अबू आझमींनी केले असते तर देवेंद्र फडणवीस व त्यांच्या आमदारांनी सभागृहात दंगल केली असती आणि या सगळ्यांवर राजद्रोहाचे खटले दाखल करायला लावले असते, अशी टीकाही ठाकरे गटाने रोखठोकमधून केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी हे मुंबईत येऊन जोरात म्हणाले, “मुंबईची भाषा मराठी नाही.” यावर राज्य सरकार थातूरमातूर उत्तरे देऊन गप्प बसले. मराठीचा अपमान आणि औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आपल्याच घरातले आहेत. अबू आझमींवर कारवाई झाली, पण भाजप परिवारातील या गुन्हेगारांना कोण वाचवत आहे? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.

मराठी भाषा आणि मराठी माणसाचे खरे शत्रू आपल्या घरातच आहेत त्याचे प्रत्यंतर रोजच येत आहे. गेल्या ४०-४५ वर्षांच्या राजकीय, सामाजिक आणि वृत्तपत्रीय जीवनात अनेक लढाया माझ्यासारखे कित्येक जण लढले. त्यात मराठी भाषेची लढाई ही कधीच संपणार नाही. कारण मराठीवर घाव घालणारे घरातच आहेत. जगाच्या इतिहासात अशी कोणतीही लढाई नसेल की, ज्या लढाईत शत्रूच्या हल्ल्यामुळे नव्हे तर ज्यासाठी आपण लढतो, त्या जनतेच्या दुराग्रहामुळे सैन्याला पीछेहाट पत्करावी लागली असेल. भारतीय जनता पक्षाचे व खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते भैयाजी जोशी यांनी महाराष्ट्राच्या राजधानी मुंबई शहरात येऊन एक धक्कादायक विधान केले. त्यांनी सांगितले, “मुंबईची भाषा मराठी नाही. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायलाच पाहिजे असे नाही.” श्री. जोशी यांनी पुढे जाऊन असे जाहीर केले की, “मुंबईतील घाटकोपरसारख्या भागाची भाषा ही गुजरातीच आहे.” मुंबईत येऊन केलेल्या या विधानाने महाराष्ट्राचे मन दुखावले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला. छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजीराजांची ही मराठी भाषा. याच भाषेतून महाराष्ट्र निर्मिती झाली. त्या महाराष्ट्रासाठी ज्या १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्या हुतात्म्यांची भाषा ही मराठी, पण भैयाजी जोशींसारखे ज्येष्ठ नेते “मराठी कशाला?” हा प्रश्न मुंबईत येऊन विचारतात व महाराष्ट्र थंड राहतो. सरकार पक्षाचे लोक जोशी यांच्या विधानाचे समर्थन करतात. मराठीसाठी लढा देणारे मुंबईत अनेक जण. एखाद्या सामान्य अमराठी दुकानदाराने मराठी भाषेचा अपमान केला तर हे मराठीवादी त्या दुकानदाराच्या कानाखाली आवाज काढतात व त्याचा गाजावाजा करून प्रसिद्धी मिळवतात, पण भैयाजींसारखा संघाचा ज्येष्ठ नेता मराठीबाबत गंभीर विधान करतो तेव्हा हे सर्व पक्ष आणि कार्यकर्ते शांत बसतात, अशा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

तर, छत्रपतींचा मराठी अभिमान राजकारणासाठी नेत्यांना छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी हवे असतात. त्यांना औरंगजेबही लागतो, पण छत्रपतींची मराठीबाबतची भूमिका त्यांना मान्य नाही. हिंदवी स्वराज्य झाल्यावर भाषेचा प्रश्न आला. स्वराज्याची भाषा कोणती? फारसी की मराठी? छत्रपतींनी त्यासाठी अभ्यास समिती नेमली नाही. छत्रपतींनी सांगितले, “महाराष्ट्राची भाषा मराठी.” असे सांगून छत्रपतींनी मराठी ही राजभाषा केली. राज्याभिषेक करून छत्रपतींनी पहिले काम करून घेतले ते म्हणजे ताबडतोब ‘मराठी राजभाषा कोश’ तयार करून परकीय भाषेची महाराष्ट्रातून हकालपट्टी केली. हा इतिहास ज्यांना माहीत नाही त्यांनी महाराष्ट्रात पाऊल ठेवू नये. मात्र मुंबईची भाषा मराठी नाही, असे उघडपणे बोलणाऱ्यांना सरकारचे संरक्षण आज मिळते.

हे ही वाचा : 

Rahul Gandhi: पक्षातील गटबाजीवर राहुल गांधी यांची तीव्र नाराजी

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्याप्रकरणात गोपनीय साक्षीदारान सगळं सांगितलं म्हणाला, भावा म्हणून हाक…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss