Tuesday, June 6, 2023

Latest Posts

सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्यात आमंत्रणासंबंधी संभ्रम

कर्नाटकाचा निकाल हा काँग्रेसच्या बाजूने लागला. त्यानंतर कर्नाटकाचा मुख्यमंत्री नक्की कोण होणार यावर गेले आठवडाभर चर्च करण्यात आल्या. त्याच बरोबर कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदी दोन्ही दावेदार हे योग्यच होते.

कर्नाटकाचा निकाल हा काँग्रेसच्या बाजूने लागला. त्यानंतर कर्नाटकाचा मुख्यमंत्री नक्की कोण होणार यावर गेले आठवडाभर चर्च करण्यात आल्या. त्याच बरोबर कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदी दोन्ही दावेदार हे योग्यच होते. त्यामुळे त्यांच्यात मक्की कोणत्या दावेदाराला मुख्यमंत्री बनवायचे हा पेच काँग्रेस पुढे उभा ठाकला होता. त्यामुळे कर्नाटक निवडणूक होऊनही अजून पर्यंत मुख्यमंत्री पदावर कोणाला निश्चित करायचे यावर बैठक घेतल्या गेल्या. सोनिया गांधी , राहुल गांधी यांच्या आणि बाकी कार्यकर्त्यांच्या बैठा का होऊन मुख्यमंत्री संबंधी कोणाचे नाव निश्चित करायचे हे ठरवून दुसऱ्या दावेदाराची समजूत काढून अंतिम निर्णय देण्यात आला. आणि सिद्धरामैय्या यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटकाची जनता हि खुश आहे. कर्नाटकमध्ये शनिवारी म्हणजेच आज दुपारी साडेबारा वाजता नवीन सरकारचा शपथविधी होत असून त्याची तयारी सुरू झाली आहे. शपथविधीपूर्वी काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीला जाऊन मंत्रिमंडळाची स्थापना आणि खातेवाटप या महत्त्वाच्या मुद्दय़ावर पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. तसेच त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाने औपचारिकरीत्या सिद्धरमैया यांची नेता म्हणून निवड केली अशी माहिती गुरुवारी झलेल्या बैठकीतून समोर आली होती. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिले. बंगळूरुमधील कांतीरवा मैदानात हा शपथविधी सोहळा होणार आहे. शनिवारी सिद्धरामय्या मुख्यमंत्री म्हणून, तर डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. या वेळी काही मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. या शपथविधी सोहळय़ाकडे विरोधकांच्या ऐक्याचे प्रदर्शन आणि शक्तिप्रदर्शन म्हणूनही पाहिले जात आहे. त्यासाठी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच समविचारी विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, भाकपचे डी. राजा आणि माकपचे सीताराम येचुरी, कमल हासन यांचा समावेश आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या शपथविधी सोहळय़ास जाणार नाहीत. त्याऐवजी त्या पक्षाच्या नेत्या काकोली घोष दस्तीदार यांना आपल्या प्रतिनिधी पाठवणार आहेत, अशी माहिती तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी ट्वीट करून दिली. शपथविधी सोहळय़ासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना आमंत्रण न दिल्यामुळे केरळमधील सत्ताधारी डावी लोकशाही आघाडीने (एलडीएफ) नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या या निर्णयावरून त्यांचे अपरिपक्व राजकारण आणि कमकुवतपणा दिसून येतो, तसेच काँग्रेस भाजपविरोधी शक्तींना एकत्र करू शकत नाही हे यावरून दिसते, अशी टीका एलडीएफचे समन्वयक ई. पी. जयराजन यांनी केली.

हे ही वाचा : 

२००० रुपयांची नोट होणार बंद! नेमकी कधी आणि का आली होती चलनात?

Western Railway ची भन्नाट आईडिया, चक्क मिनी पवनचक्क्यां द्वारे केली वीज निर्मिती!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss