Saturday, June 3, 2023

Latest Posts

Karnataka ची सूत्र Siddaramaiah कडे, तर उपमुख्यमंत्रिपदी D. K. Shivakumar विराजमान, जाणून घ्या मंत्रिमंडळात कुणा कुणाचा समावेश…

कर्नाटकात काँग्रेस पक्षाचा बहुमताने विजय झाला आहे. त्यानंतर कर्नाटकाचा मुख्यमंत्री नक्की कोण होणार यावर पूर्ण आठवडाभर चर्चा ही करण्यात आली. त्याच बरोबर कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदी दोन्ही दावेदार हे योग्यच होते.

कर्नाटकात काँग्रेस पक्षाचा बहुमताने विजय झाला आहे. त्यानंतर कर्नाटकाचा मुख्यमंत्री नक्की कोण होणार यावर पूर्ण आठवडाभर चर्चा ही करण्यात आली. त्याच बरोबर कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदी दोन्ही दावेदार हे योग्यच होते. त्यामुळे त्यांच्यात नक्की कोणत्या दावेदाराला मुख्यमंत्री बनवायचे हा पेच काँग्रेस पुढे उभा होता. १३ मे रोजी कर्नाटकमधील निवडणुकीचा निकाल लागला आणि आज सिद्धरमैया यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यामध्ये राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांनतर डिके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला कर्नाटकमधील त्याचबरोबर देश परदेशातून हजारो लोक उपस्थित होते.

आज कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धारमैया (Siddaramaiah) आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (D. K. Shivakumar) यांचा शपथविधी सोहळा पार पडला. हा शपथविधी सोहळा बंगळुरू येथील कांटेरावा स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबरोबरच इतर आठ आमदार पद आणि गोपनीयतेची शपथ घेण्यात आली आहे. सिद्धरमैया यांच्या मंत्रिमंडळामध्ये दलित, मुस्लिम, लिगायत आणि ख्रिश्चन या समाजामधील प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्याला अनेक काँग्रेसचे बडे नेते त्याचबरोबर अनेक मोठे नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे नेते अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, अभिनेते कमल हसन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसच्या पक्षाने या शपथविधी सोहळ्याला अनेक प्रमुख नेत्यांना निमंत्रण दिले होते. काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठे यश मिळाले होते. काँग्रेसने कर्नाटकमध्ये १३५ जागा मिळवल्या होत्या. कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला संपूर्ण बहुमत मिळाले आहे. तर सत्तेमधून बाहेर पडलेल्या भारतीय जनता पार्टीला अवघ्या ६६ जागा मिळाल्या होत्या. त्याचबरोबर जेडीएसलाही अवघ्या १९ जागा मिळाल्या आहेत.

हे ही वाचा : 

RCB vs SRH, कोहली मारणार बाजी की शेवटच्या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद होणार विजयी

भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना दिले भामट्यांकडून खबरदारी बाळगण्याचे आव्हान

शुभमन गिलच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss