बीड जिल्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. खंडणी प्रकरणातील आरोप वाल्मिक कराडल हा स्वतः शरणात आला आणि त्याला सीआयडीने अटक केली आहे. न्यायालयाने वाल्मिक कराडला काल उशिरा रात्री सुनावणीत १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सीआयडी फरार आरोपीचा तपास करत आहे. आता, राज्य शासनाकडून संतोष देशमुख हत्येप्रकरणी SIT स्थापन केली आहे. आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात ही समिती स्थापन करण्यात आली असून तेली यांच्यासह 10 जणांची टीम या घटनेचा सखोल तपास करणार आहे. या टीममध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्याची बाब शासन विचाराधीन होती, त्यानुसार ही एसआयटी गठित करण्यात आल्याचं गृह विभागाने परिपत्रकातून म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलीस ठाणे, बीड येथे गु. र. क्र. ६३७/२०२४ भा.न्या.सं., कलम १४०(१), १२६(२), ११८(१), ३२४(४) (५), १८१(२), १९१(२), १९०, १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली (भा.पो.से.), पोलीस उपमहानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा (EOW), सी.आय.डी., पुणे यांच्या अध्यक्षतेखाली “विशेष तपास पथक (SIT)” स्थापन करण्यात आले आहे. तसेच, बसवराज तेली यांनी शासनाकडे मागणी केल्यानुसार सदर विशेष तपास पथकामध्ये खालील काही अधिकारी व अंमलदार यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
10 जणांची SIT टीम
आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली – पोलीस उपमहानिरीक्षकअनिल गुजर – पो. उप अधीक्षक
विजयसिंग शिवलाल जोनवाल- स.पो. निरीक्षक
महेश विघ्ने – पो.उ.निरीक्षक
आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक
तुळशीराम जगताप – सहा. पो. उ. निरीक्षक
मनोज राजेंद्र वाघ – पोलीस हवालदार/१३
चंद्रकांत एस.काळकुटे – पोलीस नाईक /१८२६
बाळासाहेब देविदास अहंकारे – पोलीस नाईक/१६७३
संतोष भगवानराव गित्ते – पोलीस शिपाई/४७१
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका