spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

शिंदेंच्या पैशांनी काही बालेकिल्ले विकत घेतले गेलेत Sanjay Raut यांचा टोला

शरद पवार यांच्याशी कसला रुसवा फुगवा? एका विषयामध्ये आम्ही शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या. महादजी शिंदे यांच्या नावाने ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो, त्यांनी असं कुठलं महान कार्य केलं? महाराष्ट्र सदरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन च्या बॅनरखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

शरद पवार यांच्याशी कसला रुसवा फुगवा? एका विषयामध्ये आम्ही शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या. महादजी शिंदे यांच्या नावाने ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो, त्यांनी असं कुठलं महान कार्य केलं? महाराष्ट्र सदरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन च्या बॅनरखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. लोकांचा गैरसमज झाला की मराठी साहित्य संमेलनाने हा पुरस्कार दिला. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची फसवणूक झाली. हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता, खाजगी कार्यक्रम होता. आमच्याकडे अशा अनेक खाजगी संस्था पुरस्कार देत असतात. मराठी साहित्य परिषदेची परवानगी न घेता मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. संमेलनाचं नाव वापरून गैरवापर करून हा पुरस्कार देण्यात आला, येथे आमचा आक्षेप आहे, असे संजय राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले,”शरद पवार यांच्यासारख्या व्यक्तीला सुद्धा अंधारात ठेवलं गेलं. नाराजी व्यक्त करणं ही लोकशाही आहे. दोन स्वतंत्र विचारधारा आहेत. आमचे एखाद्या व्यक्ती विषयीचे मत टोकाचे आहे, शरद पवार यांचा पक्ष फोडणाऱ्या लोकांबद्दल सुद्धा आमचं तेच मत आहे. आमचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी फोडला. या लोकांना हाताला धरून या सगळ्या संदर्भात चर्चा शरद पवारांशी कशा बाबत करावी? आमचं आणि शरद पवार यांचे भांडण नाही. आम्ही आमचे मत मांडलं, भूमिका मांडली, त्यांची भूमिका वेगळी असेल. आमची भूमिका मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे, तसा त्यांना सुद्धा आहे.”

“एकनाथ शिंदें बाबत त्यांनी जे भाषण केले ते ऐतिहासिक आहे असं काय महान कार्य केलं ? महादजी शिंदे पुरस्कार देताना जे भाषण केलं ते इंटरेस्टिंग आहे. महाराष्ट्राला असं काय पुढे नेलं? सत्तेचा गैरवापर करून लोकांना दणका देऊन दिल्ली पुढे झुकणारे लोक आहेत. सरपटणारे लोक आहेत, त्यांना तुम्ही महादजी शिंदे पुरस्कार देता. तर त्या संस्थेची चौकशी व्हायला हवी”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

“मी दिल्लीत दोन दिवस आहे, पुस्तक सोडून द्या, अनेक मराठी लोक दिल्ली देणार आहेत. त्यांना मलाही भेटण्याची इच्छा असते. काही आमच्याशी संबंधित लोक असतात. लेखक ग्रंथ पुस्तक विक्रेते त्यांना मला भेटण्याची सुद्धा इच्छा आहे. महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना काही अडचणी असतील सरकार सगळीकडे पुरं पडू शकत नाही. त्यांच्या राहण्याच्या अडचणी असतात बाकीच्या अडचणी असतात. त्यांच्या अडचणी मला सोडवता आल्या तर नक्कीच मला आनंद होईल”, असे संजय राऊत म्हणाले.

Latest Posts

Don't Miss