केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यावर विधानपरिषदचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाले की, “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संक्षिप्त अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यात अगदी महत्त्वाचं आणि ज्याच्यावर आज सगळ्यांचं लक्ष वेधले गेलेले आहे. ते म्हणजे कुठली निवडणूक समोर नसताना ज्याची टीका केली जाते ती लोकांना प्रलोभन, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच्या सरकारने निर्मला सीतारमन यांनी अर्थमंत्री या नात्याने १२ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त केलेले आहे आणि जी काय माहिती माझ्या लक्षात आली आहे. त्याच्यानुसार ज्या लोकांचे उत्पन्न अगदी थोडं होतं आणि लगेचच त्यांना कर लागणार होता त्यांना त्यातून सुट मिळालेलीच आहे पण एकूण उत्पन्नापैकी सुद्धा १२ लाखावर जर का १२ लाखानंतरच असल्यास सुरू होणार असेल तर ते खरोखर अतिशय वेगळी गोष्ट आहे. आज माणूस दोन रुपयाचा सुद्धा विचार करतो. आपण बघतो एसटीची किंवा कुठली भाडेवाढ झाली तर मध्यम वर्गाला औषधाच्या किमती वाढल्या तरी महिला, सर्वसामान्य लोक, बेरोजगार या सगळ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे, औषधवर भर दिला आहे.”
पुढे ते म्हणाले की, “काल राष्ट्रपतींनी चांगलं भाषण केलं त्यावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी टीका केली. सोनिया गांधी यांना चष्मा लागला आहे त्यांना असं दिसत आहे. आदिवासींचा प्रश्न त्यांच्या शोषणाचा प्रश्न आला की, माणसाच्या चेहऱ्यावर त्या भावानेच दुःख दिसते, त्याच्यावरून अशी काहीतरी प्रतिक्रिया त्यांनी देणं हे योग्य नाहीये. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असं मला वाटतं.”
पायाभूत सुविधा दिल्यामुळे २०१४ पासून ते २०१९ पर्यंत आणि २०१९ पासून ते २०२४ पर्यंत या दहा वर्षांमध्ये आपल्याला शहरांचा चेहरा बदललेला दिसतोय. मग पुण्यामध्ये चांदणी चौक असेल, मेट्रो असेल, तर मुंबईमध्ये अटल सेतू असेल, मुंबई पुणे समृद्धी महामार्ग असेल, प्रत्येक शहरांमध्ये दळणवळणाच्या सुविधांबरोबर हॉस्पिटलचीसुद्धा व्यवस्था केली जाते. मला असं वाटतं की पायाभूत सुविधा वाढल्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवणं सोपं होऊ शकेल.
हे ही वाचा :
केंद्रीय अर्थसंकल्पाचा बजेट तुम्हाला कधी आणि कुठे पाहायला मिळणार
मध्यमवर्गीयांना मोदी सरकारच मोठं गिफ्ट! १२ लाखांपर्यंत आयकर लागणार नाही….