spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

एसटी कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळणार?, Gopichand Padalkar यांनी दिली माहिती

सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत. या विविध मागण्या मागण्यांसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत. या विविध मागण्या मागण्यांसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळणार असल्याची दात शक्यता दिसून येत आहे

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या भेटीत एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अन् प्रलंबित मागण्यांवर चर्चा केली. तसेच यावेळी गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणाले माहीत की, या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच सकारात्मक बातमी मिळणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांकडून मिळाले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्यानंतर एसटी महामंडळाकडून परिपत्रक त्यातील अटी शिथिल केल्या नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता जाहीर करावा, संप दरम्यान गैरहजर राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियमित करावी, या मागण्यांवर चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या एमडीला योग्य सूचना दिल्या. त्यांनी काही दिवसांत परिपत्रक रद्द करून कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. तसेच गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले आहेत की, पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत. त्यांचे राज्यभर मोठं काम आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी सर्व राजकीय नेते अन् लाखो सहकारी येतात. त्यामुळे त्यांचा हा मेळावा राजकीय दृष्टीने पाहू नये. तसेच पंकजाताई यांच्या बाबतीत कोणीही चुकीच्या स्टेटमेंट करू नये, त्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या आहेत, त्यामुळे इतर पक्षाचे लोक ज्या पद्धतीने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तसे चुकीचं काम कोणी करू नये, असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

World Bycycle Day का आणि कधी साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

Brijbhushan Singh यांना ९ जूनपर्यत अटक करावी, राकेश टीकेत यांचा सरकारला इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss