मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू झालीये. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. आणि पुढे ३ दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू झाला आहे. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू झाले आहेत. राज्यात नवनवीन घडामोडी देखील सध्या घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने मोठा वाद झाला होता. राजेश लाटकर या कार्यकर्त्यावर अन्याय व्हायला नको म्हणून आम्ही माघार घेतल्याचे खासदार शाहू महाराज यांनी स्पष्ट केलं होतं. आता उत्तर कोल्हापुरात राजेश लाटकर हेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दरम्यान, मोठ्या वादानंतरही मालोजीराजे आणि मधुरिमाराजे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.
छत्रपती शाहू महाराज यांच्या आदेशानुसार माजी आमदार छत्रपती मालोजीराजे गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आजपासून सर्व सक्रिय होतील. तसेच कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट राजेश लाटकर याना निवडून आणण्यासाठी माजी आमदार छत्रपती मालोजीराजे आणि मधुरिमाराजे छत्रपती यांच्यासह सर्व कार्यकर्ते मोठ्या ताकतीने प्रचारात उतरतील असा विश्वास माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
Manoj Jarange यांनी आखली पुन्हा रणनीती; सरकारची वाढणार डोकेदुखी
Manoj Jarange Patil यांच्यावर नेमका कोणी केला आरोप; … २४ तास राजकारणी, सेटलमेंट बादशाह…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.