राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकींच्या प्रचारासाठी अवघे दहा दिवस बाकी आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या सभा वाढल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होताना दिसणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या निवडणुकीमध्ये मनसेदेखील तेवढ्याच ताकदीने मैदानात उतरला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोशी मतदारसंघामध्ये राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी प्रचंड टोलेबाजी केली. राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणात विधानसभेत उर्दू पत्रिकेबाबत शिवसेनेच्या हिंदुत्वावर भाष्य केल्यानंतर दिंडोशी चर्चेचा विषय बनला आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय निरुपम आणि उद्धव सेनेचे उमेदवार सुनील प्रभू या दोघांनीही उर्दूमध्ये पत्रिका प्रसिद्ध केल्या आहेत. आता उर्दू पत्रकावर उद्धव ठाकरे शिवसेना उमेदवार सुनील प्रभू यांनीही स्पष्टीकरण दिले त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार संजय निरुपम यांनीही त्यांच्या उर्दू पत्रकावर स्पष्टीकरण दिले आहे.
संजय निरुपम म्हणाले की, आमच्या एक मुस्लिम समाजाच्या कार्यकर्ता आहे. त्याने मुस्लिम समाजाबरोबर एक संवाद ठेवण्यासाठी त्यांच्या भाषेमध्ये पत्रक बनवला आहेत. उर्दू या देशाची भाषा आहे उर्दू भाषामध्ये दोष नाही आहे. जर कोणी उर्दू भाषामध्ये पाकिस्तान जिंदाबाद बोलतो ते पाप आहे. सुनील प्रभू आणि उबाठाचे लोक त्यांच्याकडे जातात आणि बिर्याणी खातात. त्यांच्याकडे अमोल कीर्तिकर यांच्या रॅलीमध्ये बॉम्बस्फोटचे आरोपी होते. तसेच ते पुढे म्हणले की, राज ठाकरे कधीही कुठल्या विचार हातात घेणार, कधी कुठला विचाराच्या बाजूला उभे राहणार त्यांना पण माहिती नाही. त्याच्याबद्दल काय बोलायचं. संजय निरुपम यांनी सुनील प्रभू यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, सुनिल प्रभू यांनी लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याच पाप केलं आहे.
हे ही वाचा:
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंकडून निघून बाण उरले फक्त खान, Raj Thackeary यांचा हल्लाबोल
Shivtare – Jagtap यांच्यात विजयासाठी घमासान, पवारनिष्ठ संभाजीराव Purandar वर झेंडे फडकवणार