spot_img
spot_img
Wednesday, October 4, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

सुनील राऊतांनी केला खळबळजनक दावा

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. यानंतर शिवसेनेतील दोन गटांत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी अजूनही सुरूच आहेत. आता शिवेसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांनी खळबळजनक दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. यानंतर शिवसेनेतील दोन गटांत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी अजूनही सुरूच आहेत. आता शिवेसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांनी खळबळजनक दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. सुनिल राऊत यांनी आपल्याला आजही १०० कोटींची ऑफर असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. खासदार संजय राऊत यांनी देखील त्यांच्या बंधुंनी केलेल्या या दाव्याला दुजोरा दिला आहे.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना सुनिल राऊत म्हणाले की, आम्हालाही ऑफर होती. मला आजसुद्धा शंभर कोटींची ऑफर आहे. कारण मी स्वतः आमदार आहेच, पण माझा ब्रँड संजय राऊत मागे असल्याने १०० कोटींची ऑफर मलाही आहे. पण १०० कोटी रुपये घेऊन मला हे सगळे शिवसैनिक मिळणार आहेत का? या निष्ठा, माझ्यासाठी जीव लावून काम करणारे शिवसैनिक मिळणार आहेत का ते मला त्यांनी सांगावं असेही सुनिल राऊत म्हणाले आहेत. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. सुनील राऊत यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. मला याआधी शंभर कोटींची ऑफर होती आणि आज सुद्धा मला ऑफर आहे. कारण मी स्वतः आमदार आहेतच पण माझा ब्रँड संजय राऊत माझ्यामागे असल्यामुळे मला देखील शंभर कोटींची ऑफर आहे, असं सुनील राऊत म्हणालेत. अशा कितीही ऑफर आल्या तरी आम्ही आमचा विचार बदलणार नाही. शंभर कोटी घेऊन माझ्यासारखा निष्ठावंत शिवसैनिक बदलणार नाही, असंही सुनील राऊत म्हणालेत.

दरम्यान सुनिल राऊत यांनी केलेल्या या दाव्याला खासदार संजय राऊतांनी दुजोरा दिला आहे. संजय राऊतांनी आम्हाला देखील ऑफर्स आल्या, दबाव टाकण्यात आला होता असे सांगितले. ते म्हणाले की, माझ्या अनेक सहकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला. पण आम्ही फुटलो नाही उलट तुरुंगात गेलो. तेव्हा प्रयत्न झाला की तुरूंगात जायचं नसेल तर अमुक गटाकडे जा. आम्हाला सुद्धा दिल्लीतून फोन आले. पण आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाहीत. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेसोबतच्या निष्ठा विकणं म्हणजे आईला विकणं. जे सोडून गेले त्यांनी आपलं ममत्व, आईला विकलं. २०२४ साली या सगळ्यांना पश्चाताप होईल.

हे ही वाचा:

INDIA Alliance ने जाहीर केले मुंबई बैठकीचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर

मोदी सरकारवर संजय राऊत यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss