Friday, December 1, 2023

Latest Posts

गडचिरोलीच्या सभेत सुनिल तटकरे यांचा गौप्यस्फोट, २००९ मध्ये शिवसेनेसोबत लोकसभा निवडणूक लढवणार…

'निर्धार नवपर्वाचा,' घड्याळ तेच वेळ नवी' या अभियानाचा पूर्व विदर्भातील दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस असून गडचिरोली येथे जाहीर कार्यकर्ता मेळावा पार पडला.

‘निर्धार नवपर्वाचा,’ घड्याळ तेच वेळ नवी’ या अभियानाचा पूर्व विदर्भातील दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस असून गडचिरोली येथे जाहीर कार्यकर्ता मेळावा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये २००९ मध्ये आम्हा सर्वांना बोलावण्यात आले आणि लोकसभा निवडणूक शिवसेनेसोबत लढविण्याचे ठरविले गेले होते. मात्र काही कारणामुळे ते नंतर घडले नाही असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज गडचिरोली येथे केला.

२०१४ मध्येही भाजपला पाठिंबा दिला गेला होता. अशी स्थित्यंतरे अनेक घडली आहेत मग आता आम्ही भाजपसोबत जाऊन काय चूक केली असा सवालही सुनिल तटकरे यांनी केला. विदर्भाला सर्वाधिक न्याय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिला ही वस्तुस्थिती आहे. अनेक राज्यातील नेत्यांना आपल्या राज्यांपेक्षा बाहेरुन म्हणजे विदर्भातून अनेक नेते निवडून आले आहेत याची आठवणही सुनिल तटकरे यांनी करुन दिली. अजित पवार यांनी निवडलेल्या मंत्रीमंडळातील लोकांचे अनेकांनी कौतुक केले. मात्र आमचेच काहीजण टिका आजही करत आहेत काहीजणांना नैराश्य आले आहे असा थेट हल्लाबोलही सुनिल तटकरे यांनी केला. यंत्रणांच्या भीतीने आम्ही भाजपसोबत गेलो अशी टिका करत आहेत. स्वतः च्या सावलीला घाबरणा-या लोकांनी आमच्यावर टिका करणे कितपत योग्य आहे असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला. महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागला त्यात दोन नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस राहिली आहे याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेने पाठिंबा दिला आहे. या राज्यातील महिला भगिनींचा आलेख उंचवायचा असेल तर अजित पवार यांच्याशिवाय पर्याय नाही हेही जनतेच्या मनात आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागा असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले.

गडचिरोली जिल्हयात ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरवर आहे. ही जागा लोकसभा आणि दोन विधानसभेच्या जागा राष्ट्रवादीकडे घेतल्या तर ती निवडून आणण्याची जबाबदारी माझी असा शब्द अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम यांनी दिला. इथे नेहमी कॉंग्रेसला पाठिंबा देत आलो आहोत मात्र आपली ताकद कमी होते. त्यामुळे राष्ट्रवादीला जागा मिळाली तर आपली ताकद आणखी वाढेल असेही धर्मरावबाबा आत्राम म्हणाले. सत्तेत आलो कारण तर जनतेची, त्यांच्या विकासकामांची आम्हाला काळजी आहे या भूमिकेतूनच आपले नेते अजित पवार यांनी निर्णय घेतला मात्र यावर भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न झाला परंतु हे फार काळ टिकत नाही. मात्र या भावनिक राजकारणाला थारा न देता कामाच्या रुपाने लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अजित पवार काम करत आहेत अशी माहिती महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. शेवटच्या घटकांपर्यंत पोचणारं आपलं नेतृत्व आहे. लोकांच्या विकासासाठी काम करणारा आपला नेता अजित पवार आहेत. सर्व घटकातील लोकांना मंत्रीमंडळात अजित पवार यांनी घेवून सर्वसमावेशक घटकांना संधी दिली आहे असे मत युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी व्यक्त केले. रोहित पवार यांची जी संघर्ष यात्रा निघाली त्यात लोकं कमी आणि कॅमेरामन व पीए जास्त होते. या यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळाला नसल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करत ती रद्द केली मात्र खरे कारण प्रतिसाद मिळाला नसल्याचे सुरज चव्हाण म्हणाले. रोहित पवार यांनी संघर्ष यात्रा पुणे ते नागपूर काढण्याऐवजी ती पुणे ते इस्लामपूरपर्यंत काढण्याची खरी गरज होती कारण पक्षातंर्गत वादामुळे जे काही समोर येत आहे त्याकडे पहिल्यांदा लक्ष द्यावे असा टोलाही सुरज चव्हाण यांनी लगावला.

हे ही वाचा : 

आजचे राशिभविष्य,७ नोव्हेंबर २०२३; तुमच्यापैकी काही जण…

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भारत-पाकिस्तान सीमेवर शिवरायांच्या भव्य पुतळ्याचे होणार अनावरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss