Saturday, April 20, 2024

Latest Posts

नव्या संसद भवनाच्या सोहळ्यावर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया, एक फोन…

आज देशाला नवीन संसद भवन हे मिळाल आहे. तर एकीकडे हा सोहळा पार पडत होता तर दुसरीकडे अनेक राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार हा टाकला होता. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया ही दिली आहे.

New Parliament Building Inauguration : आज दिनांक २८ मे २०२३ (रविवार) रोजी संपूर्ण देशाचे लक्ष हे दिल्लीत सुरु असणाऱ्या सोहळ्याकडे लागले होते. याच मुख्य कारण म्हणजे आज दिल्लीत देशाच्या नवीन संसदभवनाचं उद्घाटन झालं आहे. आणि आज अखेर देशाला नवीन संसद भवन हे मिळाल आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून संसद भवनाच्या पूजेने या सोहळ्याला सुरुवात झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आज देशाला नवीन संसद भवन हे मिळाल आहे. तर एकीकडे हा सोहळा पार पडत होता तर दुसरीकडे अनेक राजकीय पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार हा टाकला होता. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया ही दिली आहे.

आज माध्यमांशी बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एरवी काम असलं की मंत्री नेत्यांना फोन करता की नाही? जेव्हा विधेयक मंजूर करायचं असतं, तेव्हा करता तसंच जर सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी, मंत्र्यांनी देशीतील सर्व विरोधी पक्षांना एखादा फोन जरी केला असता तर सर्व राजी खुशी गेले असते. तसेच त्या पुढे म्हणाल्या, संविधानानी देश चालतो असं जेव्हा म्हणतो आणि ही लोकशाही असेल तर लोकशाहीमध्ये विरोधीपक्ष असलाच पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकारांचा देखील यासाठी आग्रह होता. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नसेल तर हा कार्यक्रम अपूर्ण आहे असं माझं मत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

तर आज वीर सावरकर यांची जयंती आहे आणि ही जयंती दिल्लीतील महाराष्ट्र भवन येथे साजरी केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील खासदारांच्या उपस्थितीतीत वीर सावरकर जयंती साजरी करत आहेत. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील काही खासदारांना निमंत्रण देण्यात आलं नाहीये. याबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली आहे.

 

 

Latest Posts

Don't Miss