Friday, December 1, 2023

Latest Posts

अजित पवारांच्या मातोश्रींच्या इच्छेवर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य…

अजित पवारांच्या मातोश्रींच्या इच्छेवर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य...

सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी राजकीय वर्तुळात नेहमीच होत असते. अशातच अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी त्यांची एक इच्छा बोलून दाखवली आहे. राज्यात आज ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. यादरम्यान, काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी पवार कुटुंबाने मतदान केलं. अजित पवारांच्या आई आशा पवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील मतदान केलं. मतदानावेळी, माझ्या देखतच अजितदादाने राज्याचं मुख्यमंत्री व्हावं, ही माझी इच्छा आहे, असं त्यांच्या आई म्हणाल्या. आशाताई पवार यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांची बहीण व राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका ओळीची प्रतिक्रिया दिली आहे. “अर्थातच कोणत्याही आईला आपल्या मुलाने मोठं व्हावं, असं वाटतं”. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवार यांच्या आजारपणावर सुप्रिया ताई म्हणाल्या….

अजित पवार यांच्या आजारपणावर देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. आजार होतो तेव्हा त्या आजारी माणसाने आराम करायचा असतो, अजित दादांना सध्या आरामाची गरज आहे. राजकारणात कोणत्याही व्यक्तीचं आजारपणमध्ये आणणं, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. दादांची चौकशी मी रोजच करत असते. बरं झाल्यावर दादाला मी भेटायला जाणार आहे, शेवटी तो माझा भाऊ आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

चांदणी चौकाच्या पुलाची पाहणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यात आहेत. पुण्यातील चांदणी चौकात त्यांनी भेट देऊन या पुलाची पाहणी केली. काही दिवसांआधी सुप्रिया सुळे यांनी चांदणी चौकातल्या रस्त्यांवरील असणाऱ्या खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांनी आज या चांदणी चौकातील पुलाची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी देशातील व राज्यभरातील विविध विषयांवर भाष्य केलं.

हे ही वाचा : 

आजचे राशिभविष्य,५ नोव्हेंबर २०२३;आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची…

युवराज सिंहच्या खळबळजनक वक्तव्यानं चाहते हैराण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss