बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांना झालेल्या भयंकर आणि हादरवुन टाकणाऱ्या हाणामारीचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. सीआयडीने सादर केलेल्या दोषारोपपत्रानंतर हे धक्कादायक पुरावे समोर आले. पुरावे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले होते. त्यानंतर तातडीने हालचाली करून धनंजय मुंडेंना बोलवून राजीनामा देण्यासाठी सांगितलं. असं सुरेश धस यांनी सांगितलं. दरम्यान, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदच द्यायला नको होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्यानंतर सुरेश धसांनी पंकजा मुंडेंनी ही प्रतिक्रिया द्यायला जरा उशीरच केल्याचं सांगत आता हत्ती गेला, शेपूट राहिलं असताना बोलून काय उपयोग असा सवालही त्यांनी केला. वाल्मिक कराडच्या इव्हेंट मॅनेजमेंटने पंकजा मुंडे हुरळून गेल्याची टीकाही त्यांनी केली.
सुरेश धस नेमके काय म्हणाले ?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, की धनंजय मुंडेंना मंत्रीपदच द्यायला नको होतं. त्यांच्या राजीनामा खूप आधी घ्यायला हवा होता. पंकजाताईंना हे बोलायला फार उशीर झाला. हत्ती गेला अन् शेपटासाठी बोलल्यात. शेपटाच्या वेळी बोलून काय उपयोग. पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया फार आधी यायला हवी होती. संतोष देशमुखच्या घरी आधी त्यांनी जायला पाहिजे होतं. संतोष देशमुख कोण आहे? त्यांच्याच पक्षाचा बुथप्रमुख. मस्साजोग हे गाव मराठा बहुल गावात एजंट होणंसुद्धा पाप होईल एवढी गंभीर परिस्थिती होती. पंकजा मुंडेंचा संतोष देशमुखांनी सत्कारही केला होता. बुथप्रमुख जर मतदानाच्या वेळी नसेल तर धपाधप बोगस मतदान होईल. त्या बुथवर थांबला ना संतोष…’ पंकजाताईंविषयीची नाराजी ही आहे की त्यांनी तिथे जाऊन भेटायला हवं होतं. पण त्या गेल्या नाहीत. सगळं झाल्यानंतर आता तुम्ही म्हणतायत की धनंजय मुंडेंना मंत्रीपदच द्यायला नको होतं. तेंव्हाच का नाही म्हणालात? असा सवाल सुरशे धसांनी केला.
घटना 9 तारखेला घडली होती. 14 तारखेला मंत्रीमंडळाचा विस्तार होता. त्यामुळं मंत्रीमंडळात कोणाला घ्यायचं हा तेंव्हा प्रश्नच नव्हता. भाजपचा त्याच्याशी संबंध नाही. त्यात अजित दादा, प्रफूल पटेल, सुनिल तटकरे, यांचा विषय होता. त्यामुळे या दोन तीन नेत्यांनी तो विचार करायला पाहिजे होता. 13 तारखेला तिथे जाऊन म्हणायला हवं होतं मला द्या नाहीतर नका देऊ पद. पण धनंजय मुंडेंना मंत्रीपद देऊ नका. का देऊ नका कारण वाल्मिक अण्णा धनंजय मुंडेंच्या जवळचा होता. वाल्मिक इव्हेंट मॅनेजमेंटवाला होता. पंकजा ताईंचाही सत्कार त्यानं केला होता. त्याच्या इव्हेंट मॅनेजमेंटला पंकजाताईही हुरळूनच गेल्या. वाल्मिकनं उधळलेल्या पाकळ्या तुम्हीही घेतल्याच होत्या. असेही सुरेश धस म्हणाले.
हे ही वाचा :
Rahul Gandhi: पक्षातील गटबाजीवर राहुल गांधी यांची तीव्र नाराजी
Follow Us