बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून आरोप करत असलेले आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे त्यांची भेट झाल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. एका खाजगी रुग्णालयात सुरेश धस आणि धनंजय मुंडे त्यांची ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. ३-४ दिवसांपूर्वी ही भेट झाल्याची माहिती आहे. सुरेश धस यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात टार्गेट केले आहे. मात्र आता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर येताच आश्चर्य व्यक्त होत आहे.
या भेटी दरम्यान “सामाजिक कार्यकर्त्याअंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या, या सर्वच गोष्टी सरप्राईजिंग आहेत. माझ्या माहितीनुसार भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोघांची भेट घडवून आणली आहे. पण ही बाब अतिशय गंभीर असल्याच वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलं.
सुरेश धड यांची प्रतिक्रिया
“भाजप आमदार सुरेश धस यांनी पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालं आहे. रातोरात त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. तर दुसऱ्या दिवशी लपून-छपून नाही तर त्यांच्या निवासस्थानी मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मात्र त्यांच्याविरोधातील लढा आणि भेट या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांच्या विरोधात आम्ही कायमच राहणार. पर्वा भेटलो ते त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला गेलो होतो बाकी काही नाही,” असे सुरेश धस म्हणाले.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुरेश धस धनंजय मुंडेंवर अक्षरश: तुटून पडले होते. मात्र, दोघांची एका खासगी रुग्णालयात भेट झाल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये समेट झालाय का? या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.
या घटनेबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
“मी आणि माझ्या बरोबर सुरेश धस आणि धनंजय मुंडे आम्ही चार साडेचार तास एकत्र होतो. दोघांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत. ते दूर होतील. माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडे यांनी पक्षासोबत माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारीक भेट झाली आहे,” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
हे ही वाचा:
‘राजकारण आम्हाला पण कळतं’; Sanjay Raut यांची तोफ शरद पवारांवर कडाडली