“मी कोणालाही टार्गेट करत नाही. मी राजीनामा देखील मागणार नाही. ते मुख्यमंत्री ठरवतील तुम्ही कोणत्या दुनियेत आहात? तुम्ही कसे वागत आहात? तुमची स्टाईल कशी आहे धनुभाऊ. मी धनु भाऊ म्हणत आहे. तुम्हाला गांभीर्य नाही” असं सुरेश धस म्हणाले. “संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना १५ दिवसांचा पीसीआर मिळाला ही समाधानाची बाब आहे. सीआयडी अधिकाऱ्यांना तपास करण्याची संधी मिळेल. काल रात्री सीएम साहेबांची सही झाली. आयजी लेव्हलचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्देवी, घाणेरड्या घटनेचा तपास करणार आहेत. याची न्यायालयीन चौकशी होईल” असं बीड जिल्ह्याचे आमदार सुरेश धस म्हणाले. “राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतलय. प्रचंड रोष एकट्या बीड जिल्ह्यात नाही, तर राज्यभरात लोकांच्या मनात आहे. कोणाला ही घटना पटलेली नाही. मला वाटतं काल सर्वपक्षीय बैठक सुद्धा बीडला झाली आहे. काही निर्णय झालेत. बीड जिल्हा एकवटेल असं चित्र आहे” असं आमदार सुरेश धस यांनी सांगितलं.
बीड जिल्यात कायदा राहिला नाही. कायदा -सुव्यस्था आहे की नाही हा प्रश्न पडला आहे. बीड जिल्ह्यात गँग ऑफ वासेपूर सुरू आहे” असा मोठा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. “मी पोलीस ठाण्यात सर्वात कमी फोन करणारा नेता आहे. पोलीस, cid आरोपींच्या पाठीमागे आहेत. आरोपी लवकरच अटक होतील अशी अपेक्षा आहे. आरोपी विष्णु चाटे हा आकाच्या खालचा छोटे आका आहे. पोलिसांनी पकडलं असं वाटत नाही, ते स्वत: सरेंडर झाले आहेत. यातला आका लवकरात लवकर आत गेला पाहिजे. हा आता १०० टक्के खंडणीचा गुन्हा राहिलेला नाही. 302 चे मुख्य सूत्रधार यामागे आहेत” असा आरोप सुरेश धस यांनी केला.
हे जे वागले त्यामुळे २०० कुटूंब, व्यापारी गाव सोडून गेले. मारवाडी समाजाच्या कुठल्याही माणसाकडे काही एजन्सी राहिलेली नाही. परळीला जाऊन अराजकता बघा, लोकांच्या मुलाखती घ्या लवकरात लवकर अटक करा एक आयटी आज गठीत होईल. हे बिन भाड्याच्या खोलीत आत गेले पाहिजेत” अशी मागणी सुरेश धस यांनी केली तसेच बीडचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारावा. अजित पवार जरी झाले तरी माझी हरकत नाही” असं सुरेश धस म्हणाले. “हे दोघे पालकमंत्री होतील असे मला वाटत नाही. मागच्या पालकमंत्र्यांनी त्यांचं पालकमंत्री पद भाड्याने दिलं होतं” असा टोमणा मारला.
पाच वर्षात ते वेगळे वागत आहेत
“आकाला मी घाबरत नाही. ९ तारखेला घटना घडली आणि आका त्याच परिसरात होता. आका 302 मध्ये देखील आहे. आका सध्या रिसॉर्ट बांधत आहे. शेतकऱ्यांना धमकी देऊन काम सुरू आहे” असा आरोप सुरेश धस यांनी केला. “परळी येथील दुबे प्रकरणात देखील आका आहेत. किती लाखात मिटले मला माहीत आहे. पीडित लोक माझ्याकडे येणार आहेत” असं सुरेश धस म्हणाले. “माजी पालकमंत्र्यांकडे एकही मित्र राहिला नाही. विद्यमान खासदार बजरंग सोनावणे त्यांचे जिवलग मित्र होते. माजी पालकमंत्री पूर्वी फार चांगले होते. मात्र पाच वर्षात ते वेगळे वागत आहेत. असे का वागत आहेत हे माहीत नाही” असं सुरेश धस म्हणाले.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule