आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आमदार सुरेश धस यांचा आष्टी मतदारसंघातील ड्रीम प्रोजेक्ट खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकार्पण झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या भाषणात आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीसांचे तोंड भरून कौतुक केलं. त्यानंतर, भाषण करतांना देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार सुरेश धस यांचं कौतुक केलं. आणि या तालुक्यातील आधुनिक भगीरथ असे म्हंटले.
आधुनिक भगिरथ म्हणून या तालुक्यात ज्यांचा उल्लेख यापुढे होईल, ते आमदार सुरेश धस असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार धस यांच्या कामाचं कौतुक केलं. कार्यक्रमाला उपस्थित लाडक्या बहिणींचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. एका महत्त्वाच्या कामाचं भूमीपूजन करण्यासाठी मी आज इथं आलोय. गोपीनाथ मुंडे यांनी विशेष प्रयत्न करुन कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याला 23 टीएमसी पाणी मिळाला पाहिजे असा निर्णय झाला, पण दुर्दैवाने काही कारणास्तव केवळ 7 टीएमसी पाणी आपल्याला सापडलं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर 23 टीएमसी पाणी मराठवाड्याला द्यायचा निर्णय घेतला, पण केवळ 7 टीएमसीच पाणी असल्याचं दिसून आलं. त्यातच, आमदार सुरेश धस यांच्या मागणीनुसार महायुती सरकारने पहिली सुप्रमा आष्टीमधील या प्रकल्पाला दिली. तब्बल 11 हजार कोटी रुपयांची सुप्रमा या कामाला देण्यात आल्याचे फडणवीस यांनी म्हटले. धससाहेब, तुम्ही 2-3 टीएमसीचं मागणी करताय, पण 53 टीएमसी पाणी गोदावरीत आणण्यासाठी आपण काम करतोय, ते झालं तर मराठवाड्याची पुढची पिढी दुष्काळ बघणार नाही, दुष्काळ हा भूतकाळ होईल, असे फडणवीस यांनी म्हटले.
दरम्यान, मराठवाड्यातील पाणी आणि सरकारचे प्रयत्न यावर बोलल्यानंतर भाषणाच्या शेवटी आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी आणून दिली. त्यावेळी, सुरेश धस यांनी भाषणावेळी फडणवीसांना चिठ्ठी आणून दिली. तर, ही चिठ्ठी 3 टीमएसीची असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, यानिमित्ताने सरपंच परिषदेच्या लोकांनीही अनेक मागण्या माझ्याकडे केल्या आहेत. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुनाची घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. याप्रकरणी प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी बीडकरांना दिला. तसेच, बीड जिल्ह्याला बड्या नेत्यांचा इतिहास आहे, तोच इतिहास आपल्याला पुढे न्यायचा आहे. बीडचा गौरवशाली इतिहास तयार करण्याकरता आपल्या सर्वांच्या प्रयत्नांच्या पाठीशी मी देखील ठामपणे उभा आहे, असे म्हणत फडवणीसांनी आपण नवीन बीड तयार करू, असे म्हटले.
हे ही वाचा :
Follow Us