बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या कारणात आली. या हत्येच्या निषेध करण्यासाठी आज बीड मध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी काळे कपडे घालून, काळ्या फिती लावत हजारो लोक मोर्चात सहभागी झाले. वाल्मिकी कराडला अटक करा, धनंजय मुंडे राजीनामा द्या,अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. विविध पक्षाचे नेते देखील या मोर्च्यात सामील झाले. हा मोर्चा संपल्यानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी भाषण केले. या मोर्च्यात आमदार सुरेश धस देखील सामील झाले होते. त्यांनी मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
यावेळी सुरेश धस म्हणाले मर्डर होतात. पण ही खुनाची पद्धत खूप चुकीची आहे राव. सभागृहात म्हटलं तुम्ही गोळी घाला. किमान पटकन जीव गेला असता. तुम्ही टायर खाली घाला. अरे पण घालायचं का. संतोष देशमुख तीन टर्मचा आमदार होता. सॉरी आम्हीच आमदार असल्याने तोंडात आलं. तो तीन टर्मचा सरपंच होता. लोकांमधून निवडून आला होता. जिल्हा परिषदेत होता. एवढी त्याची क्वॉलिटी होती. पंकजा मुंडेंचा त्यांनी सत्कार केला. नमिता मुंदडा यांचा तो बुथ प्रमुख होता. त्याची अशी हत्या केली ती कुणालाही पटली नाही, असे सुरेश धस म्हणाले.
गोली मारो भेजे में भेजा शोर करता है
पुढे ते म्हणाले, अरे असले नरपाळे एक कानफटात हाणली ना पार पळत जातील. सुपारी एवढी यांची मान नाही. काहीही लिहितात सोशल मीडियावर. हेच लोक मनोज जरांगे यांच्याविरोधात लिहित होते. हेच लोक देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लिहित होते. टरबुज्या खरबुज्या म्हणत होते. आम्ही नाही केला, यांनीच केला. बीडमध्ये धनुभाऊ तुम्ही १ लाख ४२ हजार मतांनी निवडून आले. शाही एकाला लावायची. ३३० बुथांपैकी २३० बुथ ताब्यात असतील. बोगस मतांवर तुम्ही निवडून आला आहात. मतदानाच्या दिवशी लोकांना बदडता. गाड्या पुजताना तुम्ही पिस्तुल काढता. एखाद्या चौकात ठॉय करता. या बीड जिल्ह्यात ज्यांनी ज्यांनी बंदुकीचे लायसन्स दिले. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी सुरेश धस यांनी केली.
पंकू ताईंना सुरेश धस यांचा सवाल
जो गोली पर हमारा नाम होगा, उस दिन को कोई नही रोख सकता. त्यामुळे घाबरायचे नाही. संतोष देशमुखला पावणे तीनशे ठोके दिले. आमच्या पंकू ताईंना माझा सवाल आहे. पंकू ताई, संभाजी नगरला तुम्ही विमानतळावर उतरला. १२ डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा दिवस आहे. तुम्ही तिकडे गेला. मान्य आहे. पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का नाही गेला, असा सवाल पंकजा मुंडे यांना सुरेश धस यांनी विचारला.
पुढे ते बोलले, गोपीनाथ मुंडे कोण? त्यांनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला. मुंबईतील गँगवार गोपीनाथ मुंडे यांनी बंद केलं. आम्ही त्यांच्यासोबत दहा वर्ष काम केलं. तो अनुभव वेगळा आहे. पंकू ताई तुम्हाला चांगली माणसं चालत नाही. तुम्हाला जी हुजूर करणारी माणसं पाहिजे. आमची औलाद स्वाभिमानी आहे. आम्ही जी हुजूर करणार नाही. तुम्ही यायला पाहिजे होतं. आला नाही, असेही सुरेश धस म्हणाले.
यांनी मंत्रीपदच भाड्याने दिलं नाही
पंकू ताई धनू भाऊंनी तुमचं काढून घेतलं. तुम्हाला मेळच नाही लागलं. सर्व छंटाफंटा आयटम उधर है. तो कोण सांभाळत होता. यांनी मंत्रीपदच भाड्याने दिलं नाही. कृषीमंत्रिपदही भाड्याने दिलं आहे. हार्वेस्टिंगच्या निधीसाठी ४० लाखांपैकी ९ लाख वाल्मिकी कराडच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती. ही बीडची करुण कहाणी आहे. करुणा कहानी नाही म्हणत. ती पहिली बायको आहे. पण लै हाल चाललेत रे”, असेही सुरेश धग यांनी म्हटले.
नवीन अडॉल्फ हिटलर तयार झाला की काय?
वाल्मिकी कराड लोकांच्या जमीनी हडप करतो. मांजरसुप्यात एकाची जमीन हडप केली. रसाळची. तिथे त्याला स्विमिंग पूल तयार करायचा होता. अरे सिकंदरालाही परवानगी नव्हती. अडॉल्फ हिल्टरलाही परवानगी नव्हती. नवीन अडॉल्फ हिटलर तयार झाला की काय, असेही सुरेश धस म्हणाले.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule