बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो देखील वायरल झाले. वायरल झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. या हत्येत ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. फोटो वायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी चार मार्चला मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केला आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
मला धनंजय मुंडेंचा राग पण येतो आणि कीव पण येते. काय होतास तू आणि काय झालास तू? कुणीकडे होता, राज्याच्या विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी शरद पवार साहेबांनी आणि अजितदादांनी तुमच्याकडे दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुम्हाला एवढा मान दिला होता. 2019 पर्यंत तुम्ही फार चांगले वागत होतात. 2019 नंतर तुम्ही कुणीकडचे कुणीकडे गेलात, हे कशासाठी? सुदैवाने अजून हत्या प्रकरणात त्यांचा नंबर आलेला नाही. परंतु सायबर क्राईमचे तज्ञ तपासणी करणार आहे. तज्ञांची नियुक्ती सरकार करणार आहे. त्यावेळेस काही घडू नये, असे त्यांनी म्हटले.
तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जातील
संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे आरोपी होतील असे मला वाटत नाही. परंतु सायबर क्राईमचे तज्ञ सीडीआर तपासणार आहेत. दुर्दैवाने त्यात ते कुठे सापडू नयेत, एवढीच माझी प्रार्थना आहे. जर सापडले तर ते सरळसरळ आकाच्या शेजारी जातील, असे त्यांनी म्हटले.
बऱ्याच गावात नेऊन मारले
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले नव्हते, त्यावेळी तुम्ही हत्या कशी झाली याचे हुबेहूब वर्णन विधानसभेत केले होते, ते कसे केले? याबाबत विचारले असता सुरेश धस म्हणाले की, आपण कुठल्याही लोकांमध्ये गेल्यावर ते काय सांगत आहेत हे आपण नीट ऐकले पाहिजे. त्याचे पॉईंट्स टिपून घेतले पाहिजे. या घटनेत माझ्या पहिल्या दिवशी लक्षात आले की, घटना कशी घडली आहे. मी तिथे आजूबाजूच्या दहा गावात गेलो होतो. दहा गावातल्या लोकांना घटनेबाबत विचारले होते. संतोष देशमुख यांना मारेकर्यांनी बऱ्याच गावात नेऊन मारले. ज्या लोकांनी बघितलं त्यांनी सगळ्यांनी वर्णन करून मला सांगितलं. लोकांनी सांगितलेले राजकारण्यांच्या डोक्यात लगेच बसले पाहिजे. त्यामुळे मी तसे वर्णन केले आणि तसेच वर्णन फोटोमध्ये दिसून आले, असे त्यांनी म्हटले.
हे ही वाचा :
Rahul Gandhi: पक्षातील गटबाजीवर राहुल गांधी यांची तीव्र नाराजी
Follow Us