spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

सुरेश धस यांचा नवा गौप्यस्फोट,पहिल्यांदाच घेतलं आकाच्या मुलाचं नाव, महादेव मुंडेला भोकसून खल्लास केलं

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रकरण सुरेश धस यांनी लावून धरला आहे. आमदार सुरेश धस यांनी आता महादेव मुंडे हत्या प्रकरण समोर आणले आहे. महादेव मुंडे हा इसम मूळचे कन्हेरवाडीचा होता. २२ ऑक्टोबर २०२३ रोजी परळी वैजनाथच्या तहसीलसमोर हत्या करण्यात आली होती. याच प्रकरणात सुरेश धस यांनी आता नव्याने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. आणि सुरेश धस यांनी पहिल्यांदाच आकाच्या मुलाचं नाव देखील घेतलं आहे. तसंच पुढच्या तीन ते चार दिवसात आरोपींना अटक झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महादेव मुंडेचा यांना जीवे मारून टाकण्यात आलं
महादेव मुंडे यांची हत्याप्रकरणात पुढच्या दोन ते तीन दिवसांत आरोपी सापडतात की नाही ते बघा. या महादेव मुंडे यांना जीवे मारून टाकण्यात आलं. यातील आरोपी अटक व्हायला नकोत का? या माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही. त्याला भोकसून खल्लास करण्यात आलं. त्यांचा रतिबाचा धंदा होता. एवढ्या गरीब माणसाला मारून टाकण्यात आलं.

या प्रकरणातील आरोपींना पकडू नका असे आकाने सांगितले होते
या माणसाला मारून टाकून अमूक-अमूक व्यक्तीला आरोपी करून का, राजाभाऊ फड यांचे नाव घ्या असे सांगितले जात होते. राजाभाऊ फड हे विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहणार होते. या प्रकरणातील आरोपींना पकडू नका असे आकाने सांगितले होते. हेच आरोपी आकाच्या मुलाच्या आजूबाजूला फिरत आहेत. आकाचा मुलगा सुनिल आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हे आरोपी सुनिलच्या आजूबाजूला फिरत आहेत. महादेव मुंडे यांनी यांचं नेमकं काय काप केलं होतं? याची मला कल्पना नाही. मात्र त्या लोकांनी महादेव मुंडेला मारलं हे मात्र निश्चित, असा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी केला.

सगळ्या एजन्सी आकानेच घेतल्या आहेत
या भागात आकांची दहशत आहे. अजूनही लोक पुढे येत नाहीयेत. लोक बोलतील. अजून बरीच प्रकरणं येणार आहेत. गायछापच्या एजन्सीसह इतरही एजन्सी आकाने घेतलेल्या आहेत. मारवाडी, लिंगायत समाजाची तसेच इतर समाजीच अनेक लोकं आहेत, त्यांच्या एजन्सी या आकाने स्वत:कडे घेतलेल्या आहेत. आता हे लोक तक्रार करायला पुढे येतील, असंही सुरेश धस म्हणाले.

हे ही वाचा : 

घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत

देशाला पहिले खो-खो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या कर्णधारांचे फडणवीसांनी केले विशेष कौतुक, ..ही विजयश्री अविस्मरणीय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss