spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्रि‍पदाबाबत पुन्हा सस्पेन्स वाढला; Amit Shah आणि Vinod Tawde यांच्यात मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा

राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्य मिळवत महायुतीचा दमदार असा विजय झाला. त्यानंतर आता नव्या सरकारच्या स्थापनेच्या घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. गेल्या ३ दिवसांपासून राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण, याविषयी नेमका अंदाज येत नव्हता.

Amit Shah and Vinod Tawde Meeting : राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्य मिळवत महायुतीचा दमदार असा विजय झाला. त्यानंतर आता नव्या सरकारच्या स्थापनेच्या घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. गेल्या ३ दिवसांपासून राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण, याविषयी नेमका अंदाज येत नव्हता. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापैकी मुख्यमंत्री‍पदाची सूत्रे कोणाकडे जाणार, याविषयी अजूनही अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. भाजपच्या गटातून देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी (Maharashtra CM) पक्के असल्याचे सांगितले जात असले तरी मोदी-शाहांच्या धक्कातंत्राचा विचारता शेवटच्या क्षणी अनपेक्षित निर्णय होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार? याबाबतचा तिढा मात्र काही सुटायचं नाव घेत नाही. अश्यातच याबाबत राजधानी दिल्लीत खलबतं सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांची काल रात्री दिल्लीत भेट झाली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रि‍पदाबाबत अमित शाह यांनी विनोद तावडे यांना बोलावून घेतले होते. यावेळी मराठा चेहरा नसल्यास होणाऱ्या परिणामांविषयी अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्यासोबच चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात ‘महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा’ या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अन् त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलननाने घेतलेलं व्यापक स्वरूप यामुळे यंदाच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मराठा समाजाच्या मतांचा कल अत्यंत महत्वाचा ठरला. अशातच आता सत्तास्थापनेच्या घडमोडींमध्ये देखील मराठा समाजाला दुखावलं जाऊ नये, असा सूर दिसतो आहे. विनोद तावडे आणि अमित शाह यांच्या बैठकीतही याच मुद्यावर चर्चा झाली. महायुतीच्या नेत्यांची आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार आहे. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.

 

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss