spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेने केला पोलिसांना सवाल; त्यावर अधिकारी निरुत्तर

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाच्या आगारात एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याने या प्रकरणासह आधी आणखी कोणते गुन्हे केला आहेत का याचा तपास पोलीस करत आहे. स्वारगेट एसटी आगारातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हे शाखेने लष्कर पोलीस ठाण्यात तीन तास कसून चौकशी करण्यात आली आहे. मात्र, गाडे पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत असल्याची माहिती आहे. गाडे सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये आहे. या प्रकरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणात अनेक दावे करण्यात आले होते, त्यानंतर आता पिडितेने देखील माझ्या बदनामीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला आहे.

पीडितेने माझ्या बदनामीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला. त्यावर अधिकारी निरूत्तर झाले. तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडित मुलीशी संवाद साधला होता. यावेळी पीडित तरूणीने प्रश्न विचारला. दत्तात्रय गाडे या नराधमाने मंगळवारी (दि. 25) सकाळी 26 वर्षीय पीडितेवर कंडक्टर असल्याचे सांगून स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेत बलात्कार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी (दि. 28) पहाटे आरोपीला त्याच्या गावातून ताब्यात घेण्यात आले होते. पुणे पोलिसांकडे आरोपीविरोधात सबळ पुरावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, आरोपीने यापूर्वीदेखील असे प्रकार केल्याचे समोर आले असून, पीडित महिला-मुलींनी समोर येऊन गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गाडे गुन्हे शाखेच्या ताब्यात
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात दाखल बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश सोमवारी (दि. 3) दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेने आरोपी गाडेला ताब्यात घेत, याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांच्याकडे याप्रकरणाचा तपास देण्यात आला असून, आरोपीचा मोबाइल शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. आरोपी दत्तात्रय याने त्याचा मोबाइल त्याच्या गुनाट या गावातील उसाच्या शेतात लपवून ठेवल्याचे सांगितले जात आहे. आरोपीने यापूर्वीदेखील मोबाइलमध्ये महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे याप्रकरणी आरोपीचा मोबाइल जप्त करून त्याची तपासणे करणे गरजेचे आहे.

Latest Posts

Don't Miss