Thursday, April 25, 2024

Latest Posts

ठाकरे गट टेन्शन मोडवर? १२ आमदार आमच्या संपर्कात, ‘या’ बड्या नेत्यांनी केला दावा

आता ठाकरे गटाचे टेन्शन कदाचित पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. तर ही शक्यता वर्तवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून शिंदे गटातीलच मोठे नेते आहेत. आमच्या संपर्कात १२ आमदार आणि काही खासदार असल्याचा मोठा दावा शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केला आहे.

जेव्हा पासून शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून काढता पाय घेतला आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले तेव्हापासून राज्याची अनेक गणित ही बदलली आहेत. राजकारणात अनेक घडामोडींना वेग हा येत आहे. अनेक मोठं मोठ्या उलथापालथी होत आहेत. अश्यातच आता ठाकरे गटाचे टेन्शन कदाचित पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. तर ही शक्यता वर्तवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून शिंदे गटातीलच मोठे नेते आहेत. आमच्या संपर्कात १२ आमदार आणि काही खासदार असल्याचा मोठा दावा शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी एक मोठा दावा केला होता. त्यावेळी बोलत असताना ते म्हणाले होते की, शिंदे गटाचे खासदार आणि आमदारा आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्या या दाव्याला शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ठाकरे गटाचे 12 आमदार आणि काही खासदार आमच्या संपर्कात आहे असा दावा त्यांनी केला. गजानन कीर्तिकर यांनी वर्तवलेल्या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण हे आले आहे. कारण कीर्तिकर यांच्या या दाव्यामुळे ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

तसेच गजानन कीर्तिकर पुढे म्हणाले आहेत की त्यांच्याकडे जे १५ आमदार आहेत, ५ खासदार आहेत त्यातील ५ पैकी ३ ते ४ लोक तर नाहीच. त्यातील २ ते ३ लोक आहेत, त्यांची नाव घेणार नाही, पण ते अजिबात येणार नाहीत, ते मोठे लाभार्थी आहेत. १५ पैकी २ ते ३ लाभार्थी आहेत ते आमच्या सोबत येणार नाहीत. मात्र १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं गजानन कीर्तिकर म्हणाले. तसेच गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांनी ठाकरे गटाकडून तिकीट दिले जाणार आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. लोकसभा निवडणूक मी लढवेल की नाही मला माहीत नाही. लोकसभेचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीने अमोलला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण लोकसभा निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडी टीकेल की नाही हे सांगता येत नाही, असं कीर्तिकर यांनी सांगितलं. काही महिन्यांनी आघाडीच संपुष्टात येईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss