Thursday, November 30, 2023

Latest Posts

मुंब्य्रातील शाखेवरुन ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट वाद चिघळणार, उद्धव ठाकरे स्वतः मुंब्र्यात जाणार

मुंब्य्रातील शाखेवरुन ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट वाद चिघळणार, उद्धव ठाकरे स्वतः मुंब्र्यात जाणार

ठाण्यातील मुंब्य्रात शाखेवरुन शिवसेनेच्या ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट वाद चिघळण्याची शक्यता जोर धरत आहे. मुंब्र्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरवल्यानंतर ११ नोव्हेंबरला स्वतः उद्धव ठाकरे मुंब्य्राच्या शाखेला भेट देणार आहेत. २ नोव्हेंबरला मुंब्य्रातील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळवत बुलडोझर फिरवला होता. शासकीय यंत्रणा आणि पोलीस यांचा दुरुपयोग करुन मुंब्रायच्या शाखेवर शिंदे गटाने ताबा मिळवल्याचा आरोप आता ठाकरे गटाने केला आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून या शाखेचा मागील २२ वर्षापासून टॅक्स TAX भरला जात आहे, त्यामुळे या शाखेवर अशाप्रकारे बुलडोजर फिरवणे चुकीचे आहे. शिवसेनेची शाखा जमीन दोस्त करू नये यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करावा, असं पोलिसांना सांगून सुद्धा पोलीस बघ्याची भूमिकेत असल्याचं शिवसेना ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मुंब्रा येथील शाखेवर बुलडोझर फिरून ज्यांनी पाप केला आहे त्याचा हिशोब होईल, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी ११ नोव्हेंबर शनिवारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंब्रा येथील शाखेला भेट देणार असल्याचं सांगितलं आहे.” हे पाप करणारे स्वतःला बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक समजतात.हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे.शिवसेनेच्या आयत्या शाखा ताब्यात घेणे.त्यावर बुलडोझर फिरवून घटनाबाह्य मुखमंत्र्यांचा जय करणे ही विकृती आहे. मुंब्रा येथे शाखेवर बुलडोझर फिरवून ज्यांनी पाप केले त्यांचा हिशोब होईल.हे कसले शिवसैनिक? हा तर कलंक आहे.११ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंब्रा शाखेला भेट देत आहेत..तुमच्या बुलडोझर पेक्षा स्वाभिमानी मनगटातील बळ महत्वाचे..हिशोब होईल!” असं ट्विट करत या प्रकरणावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : 

कमी पाऊसामुळे ऐन दिवाळीत पाणीप्रश्न पेटणार? ‘या’ दोन जिल्ह्यात झाला पाण्यावरून वाद

पुढील ४८ तासात महाराष्ट्रासह देशभरात पाऊस; हवामान विभागाची माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss