spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

Thackeray UBT on Neelam Gorhe : ठाकरे गटाच्या महिला आक्रमक: नीलम गोऱ्हे आम्हाला समारंभाचे सामान्य कार्यकर्त्यांना माडंव घालायला सांगतात.

शिवसेना शिंदे गटाच्या डॉ.निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. दोन मर्सिडिज दिल्या तर पद मिळतं अशा प्रकारचे वक्तव्य डॉ.निलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातं केले होते. निलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिउत्तरदेखील दिले आहे. ठाकरे उत्तर देताना म्हणाले की, "आम्ही गद्दार लोकांना महत्त्व देत नाही".

Thackeray UBT on Neelam Gorhe : शिवसेना शिंदे गटाच्या डॉ.निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. दोन मर्सिडिज दिल्या तर पद मिळतं अशा प्रकारचे वक्तव्य डॉ.निलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातं केले होते. निलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिउत्तरदेखील दिले आहे. ठाकरे उत्तर देताना म्हणाले की, “आम्ही गद्दार लोकांना महत्त्व देत नाही”.

नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. संजय राऊत, सुषमा अंधारे यांनतर आता पुण्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसून आलं. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील घराबाहेर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आंदोलन केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मोठे आरोप देखील केले आहेत. दिल्लीत ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत पार पडली. मुलाखतीवेळी नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं खळबळजनक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या या मोठ्या दाव्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात पुण्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसून आलं. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील घराबाहेर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आंदोलन केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मोठे आरोप देखील केले आहेत.

अशातच आता या प्रकरणाचे अनेक पडसाद उमटले आहेत. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरें यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. ठाकरे यांच्या पक्षातील महिला शिवसैनिकांनी नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर आंदोलन केलं आहे. दिल्लीत नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्यात उमटताना दिसले. पुण्यात मॉडेल कॉलनी येथील नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमले होते. यावेळी महिलांनी नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आलीय. महिलांनी हातात टायर आणि मर्सिडीज गाड्याचे पोस्टर आणले होते त्यावरती टायरवाल्या काकू असं लिहण्यात आलं आहे. यावेळी बोलताना महिला महिला म्हणाल्या, नीलम गोऱ्हे यांनी मुलाखतीमध्ये पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा अपमान केला आहे, त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. गोऱ्हेंनी आत्तापर्यंत पदासाठी किती गाड्या दिल्या त्याच्या पावत्या त्यांनी द्याव्या, असंही या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

नीलम गोऱ्हे यांच्या या वक्त्यव्याचा निषेध करत ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सोबत आणलेल्या खेळण्यातील मर्सिडीज गाड्या दाखवत नीलम गोऱ्हे तुम्ही आता यातून फिरा म्हणत हल्लाबोल केला आहे, तर वाढदिवसाच्या वेळी नीलम गोऱ्हे आम्हाला सामान्य कार्यकर्त्यांना माडंव घालायला सांगतात, एलईडीच्या माळा लावायला लावतात. प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी करतात, त्या नीलमताई आता यावर बोलतील का म्हणत महिलांनी घोषणाबाजी केली आहे. त्या जोड्यांनी मारण्याच्या लायकीच्या आहेत असं म्हणत महिलांनी त्यांच्या फोटोला तुडवलं आहे. यावेळी महिला पदाधिकारी मोठ्या आक्रमक झाल्याच्या दिसून आल्या. काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचप्रमाणे नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागावी आणि त्यांनी आत्तापर्यंत मिळालेल्या पदासाठीच्या पावत्या पत्रकार परिषद घेऊन दाखवाव्यात असं महिलांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्या ज्या गाडीमधून फिरत आहेत त्या देखील पक्षातील गटनेत्यांनी दिली आहे. त्यांच्या वाढदिवसादिवशी खाणं, पिणं, मंडप आणि सर्व खर्च त्या आमच्याकडून घेत असल्याचा देखील दावा यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

तर पुढे, नीलम गोऱ्हे भेटीसाठी महिलांकडून गिफ्ट घ्यायच्या. त्या आम्हाला वेळ देण्यासाठी आमच्याकडून साडी घ्यायच्या, त्यांनी आमच्याकडून दहा ते पंधरा हजारांची साडी देखील घेतली असा आरोप देखील महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसाला आणि इतर पदासाठी देखील वेगवेगळ्या गोष्टी घ्यायच्या अशी माहिती महिलांनी यावेळी दिली आहे.

MSRTC: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे कर्नाटक संदर्भात महत्त्वाचे आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss