ठाणे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी आज ३ मार्च रोजी ठाण्यात सभा आयोजित करण्यात आली असून यावेळी खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजन विचारे यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ठाण्यात दाखल झाले आहेत. दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाबाहेर संजय राऊत कार्यकर्त्यांसह दाखल झाले. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शेकडो कार्यकर्त्यांनीदेखील आनंद आश्रमाबाहेर गर्दी केली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांना चांगलाच विरोध दर्शवला.
आनंदआश्रमासमोर आनंद दिघे यांच्या पुतळयाला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अभिवादन केले. त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी राऊतांनी पुतळ्याला घातलेला हार शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी काढून टाकला आणि दिघेंच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला.
शिंदे गट आणि ठाकरे गट भिडले
ठाण्यातील शिवाई नगर या परिसरात शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे गट आणि शिवसेना आमने-सामने आले असून या ठिकाणी मोठा राडा झाला आहे. या राड्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या शाखा नेमक्या कुणाच्या यावरुन वातावरण पुन्हा एकदा तापल्याचं दिसून आलं. ठाण्यातील शिवाई नगरची शाखा ताब्यात घेण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. या ठिकाणी कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे आता एकनाथ शिंदे गटाला मिळाल्याने ठाकरे गटाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले. ही शाखा प्रताप सरनाईक यांनी बांधली असून या ठिकाणचे नगरसेवक आपल्यासोबत असल्याने ही शाखा आमचीच असल्याचं ते म्हणाले. यानंतर ठाकरे गटाकडूनही एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, शिंदे गटाच्या आंदोलनावर खासदार संजय राऊत, अरविंद सावंत यांनी टीका केली. त्यांनी कितीही आंदोलन केलं तरी फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हे ही वाचा :
Bank Holidays in April 2023, एप्रिल महिन्यात बँका तब्बल १५ दिवस बंद, जाणून घ्या सुट्ट्याची यादी
Chaitra Navratri Sabudana Kheer Recipe, उपवास आहे? तर घरच्या घरी बनवा साबुदाणा खीर