मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज ११ जानेवारीला जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चात सुरेश धस म्हणाले, राजुरीत जामखेड नावाचं गाव आहे. तिथं एक अपघात झाला. यावेळी गाडीच्या चाकाखाली कुत्रा मेला आम्ही गाडीत बसणाऱ्या सर्वाना वाईट वाटलं. पण संतोषला कुठल्या पद्धतीने मारलं. मारताना तो पाणी मागत होता पण त्याला पाणी दिलं नाही. धाय मोकलून रडणाऱ्या माणसाचा व्हिडीओ काढला आणि आकाला दाखवल्याचे धस म्हणाले. तुम्ही १०० लोकात मारून त्याला घरी पाठवल्याचे सुरेश धस म्हणाले. तुमच्याकडे पैसा आणि माज आलाय असेही धस म्हणाले.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात आज ७ जणांना मोक्का लावण्यात आला आहे. राहिलेला ८ वा सुद्धा मोक्याच्या गेला पाहिजे. त्याच्यावर सुद्धा ३०२ झाला पाहिजे. यामध्ये सुद्धा आका आहे. तोच मेन असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. वरच्या आकाने १९ ऑक्टोबरला स्वतः सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली. तो यामध्ये आरोपी का नाही? असा सवालही सुरेश धस यांनी केला. दीड कोटीसाठी संतोष देशमुखची हत्या केली आहे. वाल्मिकला दीड नाही तर संतोषसाठी आम्ही ३ कोटी गोळा करून दिले असते, ते सुरेश धस म्हणाले.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नाही. आता सुरेश धस यांनी वाल्मिक कराडलाही मोक्का लावावा अशी मागणी केली आहे.