हिंगोलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आरोपीने आपल्याच पत्नी, मुलगा, सासूवर आणि मेहुण्यावर गोळ्या झाडून हत्या झाली आहे. आरोपी हा पोलीस कॉन्स्टेबल आहे. या घटनेमुळे हिंगोली जिल्हा हादरला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याकडून हे अपेक्षित नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात ही घटना घडली आहे. वसमत शहरात पोलीस कॉन्स्टेबल विलास मुकाडे कार्यरत होता. त्याने आपल्याच पत्नीची आणि पोटच्या पोराची गोळ्या झाडात हत्या केली. तेवढाच नाही तर त्याच्या सासूवर आणि मेहुण्यावर देखील गोळ्या झाडल्या आहे. या गोळीबारात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून तिन्ही जण गंभीर जखमी झाले आहे.
नेमकं काय घडलं
हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागात विलास मुकाडे याचे सासू-सासरे कुटुंबासह राहत होते. तिथे त्याची पत्नीदेखील गेली होती. मयूरी मुकाडे असं त्याच्या पत्नीचं नाव होतं. दोन्ही पती-पत्नींमध्ये सातत्याने भांडण होत होते. यामुळे यांचं नातं घटस्फोटापर्यंत येऊन ठेपली. सततच्या भांडणामुळे घटस्फोट घेण्याच्या मुद्द्यावरुन वाद झाला आणि त्याच वादात विलास मुकाडे याने गोळीबार केला.
आरोपी विकास मुकाडे याने चार राऊंड फायर केल्या. त्याने पहिली गोळी आपल्या पत्नी मयुरीवर झाडली. या गोळीबारात मयुरी हिचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी गोळी त्याने आपल्या पोटच्या अवघ्या दोन वर्षाच्या मुलावर झाडली. त्याच्या मुलाच्या पायाला ती गोळी लागली. तिसरी गोळी आरोपीने आपल्या सासूवर झाडली. सासूला पोटात ती गोळी लागली. तर चौथी गोळी आरोपीने मेहुण्यावर झाडली. त्याच्या बरगड्यांमध्ये ती गोळी गेली. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. आरोपीचा मुलगा, सासू आणि मेहुणा यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आरोपी हा गोळीबारानंतर फरार झाला होता. पोलिसांनी घटनेची संपूर्ण माहिती मिळवली आणि लगेच तपासाला सुरवात केली. काही तासातच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात कुणी दोषी असेल त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली जाणार असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधिक्षक कृष्णा कोकाटे यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule