spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार, अमित शाह यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या बैठकीमध्ये अमित शाह यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या बैठकीमध्ये अमित शाह यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्याचबरोबर मागील बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर देखील चर्चा झाली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. माध्यमांशी बोलताना अनेक विषयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले आहेत.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आमची युती वैचारिक युती आहे. बाळासाहेबांच्या विचारातील ही गेल्या वर्षाची युती आहे. या राज्यामध्ये काम करत असताना विकास प्रकल्प पुढे नेत असताना पंतप्रधान आमच्या पाठीशी उभे आहेत. अनेक प्रस्तावांना त्यांनी सढळ हस्ते मदत केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आमच्यामध्ये मतभेर असल्याचे विरोधकांकडून वावड्या उठवल्या जात आहेत. त्यामुळे आता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अडीच वर्षाच्या काळात राज्यामध्ये सर्वच कामे बंद पडली होती. हे सर्व आम्ही हटवले आहे. राज्यामध्ये अनेक प्रकल्प पुढे जात आहेत हे दृश्य स्वरूपात लोकांना दिसत आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

राज्यामधील मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा राजकारणामध्ये रंगल्या आहेत. त्याचबरोबर कोणत्या नेत्याला कोणते पद मिळेल याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अनेक आमदारांना अद्याप कोणतीही खाती न मिळाल्यामूळे नेते नाराज असल्याची चर्चा रंगल्या होत्या. १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे याआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची राजकारणामध्ये चर्च रंगल्या आहेत. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा:

Odisha Train Accident मध्ये बचावलेल्या नागरिकांसाठी Reliance Foundation चा हातभार

Rahul Gandhi म्हणाले, एकीकडे Mahatma Gandhi, तर दुसरीकडे Nathuram Godse…

Watch Video, Odisha Train Accident नंतर तब्ब्ल ५१ तासानंतर पहिली ट्रेन धावली, अन् रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss