spot_img
spot_img
Monday, September 25, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

गॅस संदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती येत आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती येत आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सबसिडी स्वरुपात ही सूट मिळेल.आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. देशात विरोधकांनी एकत्रित येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. ही आघाडी एकजुटीने मोदी सरकारला निवडणुकीत तोंड देणार आहे. विरोधक महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारला जाब विचारणार आहेत. त्यातच केंद्र सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती दोनशे रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारी आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी करण्यासंदर्भात विधान केलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये घट करण्याचा निर्णय घेतलेला असून उद्यापर्यंत त्याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.भाजप सरकारचं लक्ष्य आगामी लोकसभा निवडणुका तर आहेतच. त्यापूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुकांवर डोळा आहे. शिवाय तेलंगना राज्यातही याच वर्षी निवडणुका होणार आहे. त्याचा थेट फायदा व्हावा यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचं या निर्णयामधून दिसून येत आहे.

दरम्यान, मागे एकदा अशीच एक माहिती पुढे आली होती. त्यामध्ये सरकार गॅसच्या किमती कमी करणार असून पीएम किसान सन्मान निधीच्या मोबदल्यातही वाढ करणार आहे, असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु पुढे काहीच झालं नाही. यावेळी सरकार खरंच घोषणा करणार का? हे उद्यापर्यंत कळेलच. सूत्रांच्या हवाल्याने सर्वच माध्यमांनी आजचे वृत्त दिले आहे. तसे झाले तर घरगुती गॅस २०० रुपयांनी स्वस्त होईल.

हे ही वाचा:

अंधेरीतील शहाजीराजे भोसले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जलतरण तलाव आजपासुन सुरु…

जालना जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मुहूर्त मिळाला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss