काल १० मार्च रोजी महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण योजनेंबाबत ज्या घोषणेची प्रतीक्षा सर्वजण करत होते ती मात्र अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या २०२५- २६च्या खर्चासाठी ३६००० कोटींच्या खर्चाची तरतुद करण्यात आली आहे. मात्र लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्यासंदर्भातील घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. अर्थसंकल्पानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी लाडक्या बहिणींच्या २१०० रुपयांबाबत प्रश्न विचारण्यात आले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहिणींसाठी निधी कमी पडणार नाही, असे नियोजन केले गेले आहे. याशिवाय या योजनेतून बहिणी आर्थिक स्वावलंबी व्हावेत असे नियोजन आहे. काही बहिणींनी या पंधराशे रुपयांतून सोसायटी स्थापन केल्या. या सोसायट्यांचे जाळे निर्माण करून, राज्यस्तरीय अपेक्स अशी सोसायटी स्थापन केली जाईल. कुठलिही योजना तयार होते तेव्हा गृहितक असतं. आपल्याला योजनेसाठी किती पैसे लागणार ते वर्षभरानं समजतं. गेल्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर ठेवले आहेत. वाढवायची गरज पडल्यास, जुलै, डिसेंबर आणि मार्चमध्ये वाढवता येतात. 2100 रुपयांबाबत काम चालू आहे, शेवटी बजेटचा बॅलन्स ठेवणं महत्त्वाचं आहे आणि आपली घोषणापण पूर्ण करायची आहे. ट्रेंड चांगले आहेत. आपल्या योजना शाश्वत पद्धतीनं चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त ठेवावी लागेल. 3 टक्क्यांच्या वर जाता येणार नाही. आता आपण मागच्या वर्षी 2.9 टक्क्यांपर्यंत गेलो होतो ते 2.7 टक्क्यांपर्यंत आलं होतं. एप्रिल महिन्यात 1500 रुपये मिळतील. जेव्हा आम्ही घोषित करु की पुढच्या महिन्यापासून 2100 देऊ तेव्हापासून देऊ.
हे ही वाचा :
Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाने बळीराजाला काय काय दिले?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.