spot_img
Saturday, February 8, 2025

Latest Posts

पालकमंत्रीपदाचं निर्णय महायुतीच्या प्रमुखांनी घेतला आहे – सुनील तटकरे

धनंजय मुंडें यांचं नाव पालकमंत्री पदाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. बीडचं पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. अजित पवार हे पुण्यासोबतच आता बीडचे देखील पालकमंत्री असणार आहेत.

 

गेल्यावेळी मंत्री धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. मात्र यावेळी त्यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाही, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडेंनी बीडमध्ये प्रदीर्घकाळ काम केलं आहे. कोणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद द्यायाचं? याचा निर्णय महायुतीच्या तीन्ही पक्षातील प्रमुखांनी बसून निर्णय घेतला आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

बीडच्या मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे. यावरून विरोधकांकडून देखील सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा बीडचं पालकमंत्रिपद दिलं जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाहीये, बीडचं पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडेच ठेवण्यात आले आहे. अजित पवार हे बीडचे नवे पालकमंत्री असणार आहेत. तर पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss