spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री यांच्या आकड्यात तफावत, Union Budget मध्ये महाराष्ट्राला काय? Jitendra Awhad यांचा सवाल

Union Budget 2025: मोदी कॅबिनेट ३.० चा भारताचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून आज १ फेब्रुवारी २०२५ ला सकाळी ११ वाजता सादर करण्यात आला. आजच्या अर्थसंकल्पात कोणत्या महत्वाच्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गीयांसाठी मोठी घोषणा केली. यंदाच्या बजेटमध्ये १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. यासोबतच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणत्या गोष्टींची तरतूद केलेली आहे, याची माहिती त्यांच्या एक्स या समाजमाध्यमाद्वारे दिली आहे. त्यासोबतच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा याबद्दलची माहिती दिली आहे. आता या दोघांनी दिलेल्या माहितीत तफावत असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर ट्विट करत याबद्दलचा आक्षेप नोंदवला आहे.

काय आहे जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट?

खरे काय ते सांगा??? मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री यांच्या आकड्यात तफावत मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आकडेवारी नुसार MUTP प्रकल्पांसाठी ५११.४८ कोटी मिळाले तर अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार MUTP ३ साठी १४६५ कोटी ३३ लाख रुपये मिळाले मुंबई मेट्रो साठी १२५५ कोटी मिळाले असे मुख्यमंत्री यांनी सांगितले तर दादांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई मेट्रो साठी १६७३ कोटी ४१ लाख देण्यात आलेत पुणे मेट्रो साठी ६९९ कोटी मिळाले असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे तर पुणे मेट्रो साठी ८३७ कोटी मिळाल्याचे दादांनी सांगितले आहे मुख्यमंत्र्यांच्या आकडेवारी नुसार इंटिग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबई साठी ७९२.३५ कोटी मिळाले तर यासाठी अजित पवार यांच्या आकडेवारीनुसार ६५२ कोटी ५२ लाख मिळाले.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती

– मुंबई मेट्रो : १२५५ कोटी
– पुणे मेट्रो :६९९.१३ कोटी
– एमयुटीपी : ५११.४८ साठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: ७९२.३५ कोटी
– मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : ४००४. ३१ कोटी
– सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : १०९४. ५८कोटी
– महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प:६८३. ५१ कोटी
– महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क :५९६. ५७ कोटी
– नागनदी सुधार प्रकल्प : २९५. ६४ कोटी
– मुळा-मुठा नदी संवर्धन : २२९. ९४ कोटी
– ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : १८६. ४४ कोटी

अजित पवार यांनी दिलेली माहिती

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एमयुटीपी-३ प्रकल्पासाठी १४६५ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे मेट्रोसाठी ८३७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुळा मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत २३० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी ४ हजार ३ कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे – प्रशिक्षण संस्थेसाठी १२६ कोटी ६० लाख, मुंबई मेट्रोसाठी १६७३ कोटी ४१ लाख, महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी ६८३ कोटी ५१ लाख, महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी ५९६ कोटी ५७ लाख, ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी १८६ कोटी ४४ लाख, इंटीग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी ६५२ कोटी ५२ लाख, सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी १०९४ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळाला.ट्विट करत याबद्दलचा आक्षेप नोंदवला आहे.

हे ही वाचा :

Latest Posts

Don't Miss