विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय आणि महायुतीने बहुमताने विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय. हा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएम वर संशय केला आहे. अनेक उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे फेरमोजणीसाठी मागणी देखील केली आहे. काँग्रेसकडूनही अनेक प्रश्न उपस्थित केले त्यावर आता या मागणीला केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर दिल आहे.
अचानक मतदानाचा टक्का कसा वाढला. असा सवाल काँग्रेसने उपस्तिथ केला आहे आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील फेरफारच आरोप देखील काँग्रेसने केले आहे. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे. मतदान प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या सहभागासह पारदर्शक प्रक्रियेचे पालन केले जाते, हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला चर्चेचं निमंत्रण दिल आहे. ३ डिसेंबरला चर्चेला येणंच निमंत्रण देण्यात आला आहे.
महाराष्ट्र निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीबाबत त्यांची चिंता, हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम प्रक्रियेबाबत काही शंका अशा सर्व बाबींवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला सर्व कायदेशीर समस्यांचं निरसन केलं जाईल, असं आश्वासन देण्यात आला आहे.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेंची चुप्पी अन् भाजपला ताप ! शिंदेंच्या मनात नेमकं दडलंय तरी काय ?
शिंदे गटातील ‘या’ ४ नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा विरोध, Eknath Shinde काय भूमिका घेणार?