Friday, December 1, 2023

Latest Posts

मोदी सरकार देशात आल्यापासून लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर आघात सुरू, जितेंद्र आव्हाड

लोकशाहीचे चार आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न देशातील मोदी सरकारकडून वारंवार होत आहे. या संदर्भात अनेक घटना देखील समोर आल्या आहेत.

लोकशाहीचे चार आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न देशातील मोदी सरकारकडून वारंवार होत आहे. या संदर्भात अनेक घटना देखील समोर आल्या आहेत. आज दिल्लीमध्ये अनेक मोठ्या पत्रकारांच्या घरी छापेमारी करण्यात येत आहे. मोदी सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या व्यक्तींविरोधात सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून कारवाई करण्यात येत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, आज दिल्लीतील काही मोठ्या पत्रकारांवर छापे टाकण्यात आले. त्यांचे फोन आणि लॅपटॅाप ताब्यात घेण्यात आले आहे. भिमा कोरेगाव प्रकरणात अश्याच प्रकारे एका पत्रकार यांचा लॅपटॅाप ताब्यात घेण्यात आला होता. त्यात नंतर काही बाबी टाकून तो पुरावा म्हणून सादर करण्यात आला होता. तसा प्रकार घडू नये असे आम्हाला वाटते असे आव्हाड म्हणाले.जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, बिहार राज्यांमध्ये तेथील राज्य सरकारने जातीय जनगणना केली आहे. काल एक चांगली गोष्ट घडली की बिहारची जातनिहाय जनगणना बाहेर पडली. या संदर्भातील आकडेवारी आता समोर आली आहे. जातीय जनगणना देशात करण्यात यावी या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने अनेकदा मागणी केली आहे. जातीय जनगणनेमुळे उपेक्षित समाजाला न्याय मिळणार आहे. महाराष्ट्रात ही जातनिहाय जनगणना व्हावी ज्याला फडणवीस यांनी ही पाठिंबा दिला होता. ते केले जावे. याचा फायदा मराठा समाजाला होईल. महाराष्ट्रात खरी परिस्थिती काय आहे हे कळण्यासाठी ही जनगणना झाली पाहिजे असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. जितेंद्र आव्हाड म्हणाले की अनेक राज्यांमध्ये आरक्षण वाढवून देण्याकरिता मागणी केली आहे. मात्र 50 टक्के ची अट असल्याने त्या राज्यातील अपेक्षित समाजाला न्याय देता येत नाही जर मागासवर्गीय व्यक्तींची संख्या ९०% असेल तर ५० टक्के अट कशाला असा प्रश्न देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. जनगणनेच्या माध्यमातून मागासवर्गीयांना मिळून द्यायच आहे. केंद्रातील सरकारने धर्म हा एकच शब्द समोर करून संपूर्ण जाती एक करण्याचा प्रयत्न केला आहे केंद्राने असे कितीही प्रयत्न केला असला तरी असे होऊ शकणार नाही असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करणारे वाघ नख राज्य सरकारकडून आणण्यात येणार आहे मुळात ही ती वाघ नख नाही आहे या संदर्भात अनेक इतिहासकारांनी माहिती लिहिली आहे. महाराष्ट्रात वाघ नख आणत आहे. ती कुठून आणत आहे. त्यांच्या वेबसाईटवर लिहीले आहे की आमच्याकडे याचा काही पुरावा नाही. ते एक हत्यार आहे. ती वाघनखे ही नाही हे १०० टक्के खरे आहे. वाघ नख ही गॅंड डफला दिली होती. राज्यातील राज्य सरकार इतकी वाजत गाजत ही खोटी वाघनखे तीन वर्षासाठी आणली जाणार आहे. आम्ही भावनांवर बोलत नाहीत. आम्ही इतिहासावर बोलतो. या वाघनखाचा कुठलाच पुरावा मिळालेला नाही. काही इतिहासकारांनी महाराजांनी अफजलखानाला मारण्यासाठी वाघनखे वापरली नव्हती असे सुद्धा म्हटले आहे. ऐतिहासीक पुरावा लागतो. असे देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजी नगर आणि नांदेड मधील रुग्णालयामध्ये झालेल्या निष्पक मृत्यू राज्य सरकारच्या कार्यपद्धतीमुळे झाले आहे. राज्यातील राज्य सरकार केवळ राजकारणात गुंतली आहे. सर्वसामान्य जनतेकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नाही ग्रामीण रुग्णालयात अनेक ठिकाणी औषधी उपलब्ध नाही औषधी उपलब्ध नसल्यामुळे या निष्पाप व्यक्तींना जीव गमावा लागला आहे. औषधाअभावी अशा प्रकारे मृत्यू ग्रामीण रुग्णालयात होत आहे हे धक्कादायक बाब आहे असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा: 

चिनी फंडींग प्रकरणी दिल्लीतील पत्रकारांच्या घरी पोलिसांची छापेमारी

एक्स रे काढण्याचा बहाना करत आरोपी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळाला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss