Tuesday, May 30, 2023

Latest Posts

११ महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या सरकारने दिले शेतकऱ्यांना आव्हाहन

एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आणि त्यांना शेतीसाठी लागणाऱ्या उपाययोजनासंबंधी बैठकी घेण्यात आली. या बैठकी दरम्यान त्यांच्या सोबत दादा भुसे देखील उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आणि त्यांना शेतीसाठी लागणाऱ्या उपाययोजनासंबंधी बैठकी घेण्यात आली. या बैठकी दरम्यान त्यांच्या सोबत दादा भुसे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. तसंच, यंदा दुबार पेरणीची वेळ येऊ देणार नाही, असं नियोजन केल्याचं त्यांनी सांगितलं.आता शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू होईल. या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जाऊ लागू नये म्हणून राज्य सरकारने विविध नियोजनांसाठी राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठकीचं आयोजन केलं होतं. त्याचबरोबर शेतीला या लागणारी बी बियाणे, खाते, तसेच शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या उपाययोजना केल्याचे देकील एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तसंच, यंदा दुबार पेरणीची वेळ येऊ देणार नाही, असं नियोजन केल्याचं एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केल्याचे सांगितलं.

“बळीराजा, शेतकरी, अन्नदात्याला शुभेच्छा देऊन येणारा खरीप हंगामासाठी यशस्वी व्हावा या साठी एकनाथ शिंदे यांनी देवाकडे आणि वरून राजा आकडे विनवणी केली. वारुणराजाला प्रसन्न होऊन आमच्या गोरगरीब शेतकऱ्याला चाले धान्य येउदे चांगली शेतीची मशागत होऊ दे अशी प्रार्थना करण्यात आली. तसेच राज्यस्तरीय पातळीवर खरीप हंगाम संबंधी बैठकि घेण्यात आल्या. अतिशय नियोजनपूर्वक कृषी विभाग, सहकार विभागाचं सादरीकरण झालं. खरीप हंगाम शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा हंगाम आहे. तो यशस्वी होण्याकरता सूचना देण्यात आल्या आहेत. बियाणे, खतं, किटकनाशके मुबलक प्रमाणात आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याहि गोष्टीचा तुटवडा भासू दिला जाणार नाही. अशी उपपाययोजना करण्यात आली आहे. बोगस बियाणे, बोगस खतं विकून बळीराजाला त्रास देण्याचं काम करेलत्यांच्यावर तेव्हाच योग्य ती कडक कारवाई करण्यात येण्याचे साइकनाथ शिंदे यांनी सांगितले. कुठेही त्रुटी, उणीव भासता कामा नये. आणि अचानक पाऊस पुढे गेला तर काय करायचं यावर नियोजन करण्यात आलं आहे. दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

खरीप हंगामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला की, “हवामान खात्याचा अंदाज चुकला तर दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं. अशावेळी सरकार काय पावलं उचलणार?” पत्रकारांच्या या पर्यावरणीय प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय उत्तर दिलं. ते म्हणाले की, “यावेळी अंदाज चुकणार नाही. आम्ही ११ महिन्यांपूर्वी सरकार स्थापन केलंय, त्यामुळे अंदाज असा चुकणार नाही. याआधी अंदाज चुकले असतील” असं म्हणत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच गालातल्या गालात हसत होते. शिंदे यांनी खोचकपणे विरोधकांना टोला लगावला आहे.

हे ही वाचा:

जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात कोणताही वाद नाही, छगन भुजबळ

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला ‘रावरंभा’ चित्रपटाचा विशेष शो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss