spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

छगन भुजबळांची सकाळच्या शपथविधीची रंजक कहाणी…

शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबीर पार पडले. या शिबिरमध्ये अनेक नेते शामिल होते. या शिबिरादरम्यान पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी २०१९ साली झालेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की, तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र आहे, असे खळबळजनक वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केला, त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र, आज पक्षाचे नेते आणि आमदार छगन भुजबळांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीची रंजक कहाणी माध्यमांशी बोलताना सांगितली आहे.

काय म्हणालेत छगन भुजबळ

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, धनंजय मुंडे यांचे भाषण झालं, त्यावेळी मी नव्हतो. मात्र, माध्यमांच्या द्वारे मी त्यांचा भाषण ऐकलं. मुंडे म्हणाले, ते षडयंत्र होतं. मग हे षडयंत्र कोणी रचलं? एकतर उद्धव ठाकरे षडयंत्र रचू शकत नाहीत. काँग्रेस देखील असं षडयंत्र रचू शकत नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी हे षडयंत्र रचलं की भाजपच्या नेत्यांनी रचलं? याची काहीच माहिती नाही. मला एवढं मात्र आठवतं, त्यावेळेला मीटिंग सुरू होत्या. काँग्रेस, ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या बैठका सुरू असताना काँग्रेसचे नेते खरगे आणि शरद पवार यांच्यामध्ये थोडासा वाद झाला आणि शरद पवार रागाने निघून गेले.

त्याच्यानंतर काही प्रमुख मंडळीची मिटिंग सुरू होत्या. आमच्या राष्ट्रवादीची आठ वाजता एका ठिकाणी मीटिंग बोलवली गेली. परंतु, त्या मिटींगला अजित दादा हजर नव्हते. ते कुठेतरी अडकले होते. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सकाळी टीव्ही लावल्या,आठ नऊ वाजता तेव्हा लक्षात आलं की, अजितदादांचा शपथविधी झालेला आहे. मी शरद पवार यांच्याकडे गेलो. तोपर्यंत उद्धव ठाकरे यांना फोन केलेला होता आणि सांगितलं होतं, आपण मजबुतीने उभा राहिला पाहिजे आणि हा जो काही प्रयत्न झालेला आहे, ते होणार नाही याची आपण काळजी घेण्यासाठी कामाला लागू या. आम्ही सर्वजण तेव्हा विचारात होतो, आम्हाला याबाबतची काहीच कल्पना नव्हती की, असं होईल. अचानकच ते सगळं झालं होतं. त्यावेळी आम्ही सुद्धा इकडे तिकडे गेलेले आमदार यांना गोळा करायला सुरुवात केली. हे मला माहिती आहे, पुढे त्यानुसार मी प्रत्यक्ष अजित पवार यांच्या घरी गेलो. त्यांना सांगितलं तुम्ही असं करू नका परंतु दुसऱ्या दिवशी कोर्टाचा निकाल आला. त्या निकालाच्या नंतर देखील आम्ही त्यांना सांगितलं निकालानंतर तुमची पुढची वाटचाल फार कठीण झालेला आहे. तुम्ही हे सगळं सोडून द्या आणि पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे परत या, असं छगन भुजबळ यांनी अजित पवारांनी सांगितलं होतं.

त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसची जी मीटिंग झाली, त्याच्यामध्ये सर्व आमदार हजर होते. त्यावेळी मी ठराव मांडला. अजित पवार चुकले असतील ठीक आहे. परंतु त्यांना परत आपल्या पक्षांमध्ये घेतलं पाहिजे आणि त्यानंतर अजित पवार यांना मीटिंगमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर त्यांचं सगळ्यांनी स्वागत केलं. इतकंच नव्हे तर उपमुख्यमंत्री कोणाला करायचं तर या वेळेला सुद्धा सांगितलं होतं अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करा. हे मी सांगितलं. त्यावेळी काहींना वाटत होतं अजित दादा नाहीतर आपण उपमुख्यमंत्री व्हावे, त्यांना थोडासं वाईट वाटलं, त्यांना माझा राग सुद्धा आला होता, परंतु त्यावेळी मला ते योग्य वाटलं म्हणून मी केलं. काल धनंजय मुंडें यांनी जे काही सांगितलं, त्याचा रोख कोणाकडे होता याची मला काही कल्पना नाही, ते त्यांनाच विचारा असंही पुढे छगन भुजबळ यांनी म्हटल आहे.

हे ही वाचा : 

घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत

देशाला पहिले खो-खो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या कर्णधारांचे फडणवीसांनी केले विशेष कौतुक, ..ही विजयश्री अविस्मरणीय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

 

Latest Posts

Don't Miss