कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान हे १० मे रोजी होणार आहे. त्याआधी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कर्नाटक मध्ये गेले आहेत. कर्नाटकच्या प्रचार करताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राचा आणि कर्नाटकचा इतिहास खूप जुना आहे. इथूनच शहाजी महाराज यांनी पहिले होते चितंत्रपट शिवाजी महाराज यांनी पूर्ण केले होते. महाराष्ट्राच्या आज मी काही मंदिरामध्ये मी गेलो होतो तेथे मला प्रसन्न वाटले. कन्नडमध्ये एक त्या ठिकाणी भावगीत आहे असाच आपल्या दोन्ही राज्याचे मिळती जुळती संस्कृती आहे आणि त्यामुळे मी इकडे येण्याच्या नंतर काही महाराष्ट्राचे कर्नाट्कमधील लोक आले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज शिवसेना आणि भाजप यांची युती आहे. त्यामुळे आज युती असल्यामुळेच मी आज इथे प्रचारासाठी आलो आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, आम्ही मैत्री करतो तर पूर्ण इमानदारीने आणि मैत्री करतो तर निभावतो सुद्धा परंतु आज मी फार जास्त काही बोलणार नाही महाराष्ट्राच्या बद्दल. तुम्हाला सर्वाना माहिती आहे ही सरकार डबल इंजिनची सरकार आहे. तसेच कर्नाटक मध्ये सुद्धा डबल इंजिनाची सरकार आहे. डबल इंजिन सरकारचा जो अनुभव आहे तो मी ७-८ महिन्यामध्ये मी घेतला आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरु आहेत. किती तरी योजना बंद होत्या सरकार येण्याच्या आधी परंतु आम्ही त्या योजना आता सुरु केल्या आता त्या योजनांना आम्हाला केंद्र सरकार पूर्णपणे पाठिंबा देत आहे. कर्नाटकमध्ये बरेच प्रोजेक्ट अजून ठप्प आहेत. येणाऱ्या १० तारखेला ही कर्नाटकची जी जनता आहे ती पुन्हा एकदा डबल इंजिनची सरकार नक्की आणेल असे प्रचारामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हे ही वाचा :
युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली
राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना
Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत