एकीकडे मराठा आर्खसनचा मुद्दा चालू असताना दुसरीकडे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बीडचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराची जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड मराठा आंदोलकांनी (Maratha protest) केली. प्रकाश सोळंकेंच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून मराठा आंदोलका आक्रमक झाले. सोळंकींच्या घरावरील दगडफेक प्रकरणी पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले असून आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी संवाद साधणाऱ्या सुंदर भोसलेला पोलिसांनी घेतले ताब्यात घेण्यात आले.
एका मराठा आंदोलकानं अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंना फोन केला आणि मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरू केली. याच ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना आमदार प्रकाश सोळंकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरून राडा झाला झाला. एक मराठा आंदोलकानं आमदार प्रकाश सोळंकेंना फोन केला आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. मुदतीचे ४० दिवस संपल्याची आठवण प्रकाश सोळंकेंना मराठा आंदोलकानं करुन दिली. त्यानंतर प्रकाश सोळंके म्हणाले की, “कोण म्हटलं सरकार आरक्षण देत नाही. ४० दिवस झाले म्हणून काय झालं? हे आरक्षण देऊन कोर्टात अडकवून ठेवायचं का परत? अशी आडमुठी भूमिका घेऊन चालत नाही, शासन देण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे, एवढंच शासनाचं म्हणणं आहे. त्यादृष्टीनं जे काही आवश्यक आहे, ते सर्व शासन करतंय. शासनानं समिती नेमली आहे, त्या समितीचा अहवाल घेऊन शासन आरक्षण देणार आहे.”
प्रकाश सोळंके यांच्यांशी साधलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर मोठा जमाव दगडफेक करत जाळपोळ करत होता. सुंदर भोसले हा धारूर तालुक्यातील धूनकवड येथील रहिवासी आहे. रात्री उशिरा सुंदर भोसले याला माजलगाव पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा :
SHRIKANT SHINDE: व्हीआयपी कल्चर नकोय, रस्ता बंद करण्याचा आम्हाला अधिकार नाही
आजचे राशिभविष्य, २ नोव्हेंबर, २०२३, इतरांना दुखावू नका