पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली. लोणावळच्या पोलिसाने कर्तव्यावर असताना दारूच्या नशेत चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा संतापजनक पारकर समोर आला आहे. ही घटना काल नाताळ दिवशीचं घडला. कर्तव्यावर असतांना पोलीस दारूच्या नशेत होता, याच नशेत त्याने पाच वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले आहेत. पोलिसाचा नाव सचित सस्ते आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सचिन सस्तेला ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नाताळची सुट्टी असल्याने पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते, म्हणून नराधम पोलीस सचिन सस्ते तिथे बंदोबस्तावर होता. तिथे त्याने एका हॉटेलमधून भाकरी घेतली आणि जेवण केलं. त्या भाकरीचे बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला, तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता. त्यावेळी त्याने तिथे पाच वर्षीय चिमुरडीला पहिले. लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केला असता तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असं तो तिला म्हणाला. मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला. पोलिसांना हा सगळं प्रकार सांगण्यात आला. ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता, त्याचं पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं
आम्ही विसापूरच्या पायथ्याशी राहतो. आमचं तिथं घर आहे. आमची छोटी मुलगी तिथं वाळूच्या ढिगाऱ्यावरती खेळत होती. मी त्या पोलिसाला जेवायला दिलं, त्यानंतर मी शेतावर गेले, मुलगी तिकडे खेळत होती, आणि माझी सून आणि भाची घरामध्ये स्वयंपाक बनवत होत्या. माझी सून जेव्हा काऊंटरजवळ आली तेव्हा त्या लहान मुलीने आपल्या आईकडे येऊन सांगितलं, त्या पोलिस काकांनी मला मागं नेलं आणि माझ्या अंतर्वस्त्रांमध्ये हात घातला. ती रडत होती, आणि घाबरली होती. सुनेने आणि माझ्या मुलाने मला फोन केला. मी घरी आले. तेव्हा माझ्या मुलाने मला सर्व घटना सांगितली. त्यानंतर आम्ही पोलिसांना बोलावलं. त्यांनी विचारलं काय झालं, तेव्हा त्यांना सर्व माहिती दिली, जर कायद्याचे रक्षक असं वागतं असतील तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा असं त्या चिमुकल्या मुलीच्या आजीने सांगितलं आहे.
चिमुकलीच्या आजीने केला प्रश्न उपस्तिथ
खाकी घातलेल्या त्या पोलिसांनी दारू पिलेली होती. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, कायद्याचं रक्षण करणारे लोक जर असे गरिबाची छेड काढायला लागले तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा असा सवाल देखील त्या चिमुरड्या मुलीच्या आजीने उपस्थित केला आहे.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule