Tuesday, April 23, 2024

Latest Posts

‘द केरला स्टोरी’ चित्रपट बघितल्यावर राजकारण्याची भूमिका

द केरला स्टोरी या चित्रपटामुळे राजकारणात वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ काढून त्यातून वादंग निर्माण होताना दिसत आहे. तर राजकारणात तर बऱ्याच राज्यात द केरला स्टोरी हा चित्रपट दाखवण्यासाठी देखील बंदी घातली आहे.

द केरला स्टोरी या चित्रपटामुळे राजकारणात वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ काढून त्यातून वादंग निर्माण होताना दिसत आहे. तर राजकारणात तर बऱ्याच राज्यात द केरला स्टोरी हा चित्रपट दाखवण्यासाठी देखील बंदी घातली आहे. आणि त्यामुळे राज्याराज्यात वाद होताना दिसत आहे आणि तसेच बरेच राजकारणी या मध्ये उडी घेऊन नवीन वादाला जन्म देण्याचा प्रयत्न करत आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे. काही राज्यामध्ये या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात असून काही राज्यांनी मात्र हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे, तर अनेक राजकारणी चित्रपट बघण्यास गेल्यानंतर त्यांच्या काय भूमिका होत्या आणि चित्रपटाचे अनेक पडसाद उलटले दिसले तर जाणून घेऊया राजकारण्यांमधून द केरला स्टोरी ची काय आहेत मत ?

सध्या द केरला स्टोरी ने चित्रपट क्षेत्रात धुमाकूळ गाजवत आहे. द केरला स्टोरी हा चित्रपट चांगलाच लोकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. मात्र केदार शिंदे यांच्या महाराष्ट्र शाहीर चित्रपटाला मिळणार प्रतिसाद काही अंशी कमी झाला आणि म्ह्णून केदार शिंदे यांनी भाष्य केले होते. आणि आता केदार शिंदेच्या मागोमाग पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला त्यांच्या राज्यात बंदी आणली आहे. त्यांनी बंगालमधल्या थिएटर्समधून द केरला स्टोरी चित्रपट हटवण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. राज्यात शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक भाजप नेते आणि कार्यकर्त्यांसह चित्रपट पाहण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘द केरळ स्टोरी’ हे जनजागृतीची मोहीम असल्याचे वर्णन केले. हा चित्रपट नसून प्रबोधनाची मोहीम आहे, जी खऱ्या अर्थाने सिनेमाच्या माध्यमातून समोर आणली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर जितेंद्र आव्हाड ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात ३२ हजार महिलांची कथा मांडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना दावा केला की, चित्रपटाचे निर्माते स्वत: न्यायालयाला सांगतात की ही कथा केवळ तीन महिलांची आहे. या चित्रपटामुळे आपल्या देशाची जगभरात बदनामी झाली असून, देशात धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.देशात अराजकता माजवणाऱ्या आणि देशाची बदनामी करणाऱ्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या निर्मात्याला फासावर लटकवले पाहिजे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.

Latest Posts

Don't Miss