Saturday, April 20, 2024

Latest Posts

शिंदे – फडणवीस सरकारने केली जिल्हानिहाय पालकमंत्रीपदाची यादी जाहीर

यादीत २१ जिल्ह्यांचे पालकमंत्री पद हे फडणवीस गटाच्या मंत्र्यांकडे आहे तर एकूण १५ जिल्ह्यांची पालकमंत्री पद ही शिंदे गटाकडे आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर गेले अनेक दिवस पालकमंत्रीपदाचं (guardian minister) वाटप रखडलं होतं. यावरून शिंदे, फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केल्या जात होत्या . पण, अखेर शिंदे – फडणवीस सरकारला शनिवारी पालकमंत्रीपदाच्या वाटपाला मुहूर्त मिळाला आणि शिंदे सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. पण या जिल्हानिहाय पाल्कमंत्रीपदाच्या यादीवर अनेक नेत्याकडून नाराजी व्यक्त केली जातेय कारण यातील अनेक मंत्र्यांना दोन ते तीन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे.

तसेच अपेक्षित जिल्ह्याचं पालकमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे, फडणवीस सरकारमधील काही मंत्री नाराज असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारात मिळालेल्या खात्यावरून शिंदे गटातील काही मंत्री नाराज असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता अपेक्षित जिल्ह्याचं पालकमंत्रीपद न मिळाल्यानं काही मंत्री नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

जाहीर झालेल्या या यादीत २१ जिल्ह्यांचे पालकमंत्री पद हे फडणवीस गटाच्या मंत्र्यांकडे आहे तर एकूण १५ जिल्ह्यांची पालकमंत्री पद ही शिंदे गटाकडे आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलेल्या या यादीत विदर्भातील ६ जिल्ह्यांची पालकमंत्री पदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत.

पहा कोणाला मिळाल कोणतं पद?

  • देवेंद्र फडणवीस – नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला भंडारा, गडचिरोली
  • राधाकृष्ण विखे – सोलापूर, अहमदनगर
  • सुधीर मुनगंटीवार – चंद्र्पुर, गोंदिया
  • चंद्रकांत पाटील – पुणे
  • विजयकुमार गावित – नंदुरबार
  • गिरीश महाजन – धुळे, लातूर, नांदेड
  • गुलाबराव पाटील – बुलढाणा
  • दादा भुसे – नाशिक
  • संजय राठोड – वाशीम, यवतमाळ
  • सुरेश खाडे – सांगली
  • संदीपान भुमरे – छत्रपती संभाजीनगर
  • उदय सामंत – रत्नागिरी, रायगड
  • तानाजी सावंत – परभणी, धाराशिव
  • रवींद्र चव्हाण – पालघर , सिंधुदुर्ग
  • अब्दुल सत्तार – हिंगोली
  • दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर
  • अतुल सावे – जालना, बीड
  • शंभूराज देसाई – ठाणे, सातारा
  • मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

पालकमंत्रीपदाची यादी जाहीर होताच भाजप मंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापुरातील अंबाबाईचे दर्शन घेतले आहे. दीपक केसरकर यांना मुंबई शहर आणि कोल्हापूरचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. पण दुसरीकडे भाजपमधील अनेक नेत्यांकडून अपेक्षित जिल्ह्याचे पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली जातेय.

हे ही वाचा:

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस प्रमुख संजय पांडे यांना ताब्यात घेतले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss