spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

महायुतीच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला?

Maharashtra Assembly Election Result : विधानसभा निवडणुकीत यावर्षी महायुतीला निर्विवाद यश मिळाले आहे. यामुळे मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता वाढली आहे. २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकांचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत झाली होती. या लढतीत महायुतीने महविकासआघाडीला पराभूत करून विजय मिळवला आहे. यात १३२ जागा भाजप, ५७ जागा शिंदे, आणि ४१ जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गट आघाडीवर आहेत. तर महविकासआघाडीला फक्त ४६ जागांवर समाधान मानावे लागले आहेत. तर १६ जागा काँग्रेस , ठाकरे गट २० जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट १० जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष- इतर यांना १२ जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. तर यानंतर आता सत्तस्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद यश मिळाले आहे. यामुळे मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. तसेच विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याबद्दल महायुतीकडून काहीही स्प्ष्ट करण्यात आले नव्हते. यामुळे मुख्यमंत्रिपदावरून महायुतीतही धुसफूस असल्याचे पाहायला मिळत होते. तर आता महायुतीला बहुमत मिळालं आहे. त्यातच भाजपचे १३२ आमदार निवडून आल्याने भाजपकडून मुख्यमंत्रीपदावरून दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच कायम राहावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहे.

महायुतीच्या गोटातील हालचालींना वेग
काल २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी निकाल जाहीर झाला असून महायुतीने महाविकासआघाडीला पराभूत करून विजय मिळवला. सध्या महायुतीच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयानंतर भाजपात मुख्यमंत्री निवडीसाठी मोठ्या हालचालींना वेग आला आहे. विधीमंडळ नेता निवडीसाठी दिल्लीतून 2 निरीक्षक पाठवले जाणार आहेत. तर केंद्रीय भाजपकडून २ निरीक्षक राज्यात पाठवले जाणार आहेत. विधिमंडळ नेता निवडीनंतरच भाजप सत्ता स्थापनेचा दावा देणार आहे. तर एकनाथ शिंदे दुसरीकडे यांच्या शिवसेनेतही मोठया हालचाली घडत आहे. आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कोण होणार नवा मुख्यमंत्री
दिल्लीमध्ये महायुतीच्या तिन्हीही पक्षांचे नेते जाणार आहेत. यावेळी मुख्यमंत्रीपदाची माल कोणाच्या गळ्यात पडणार यावर चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर दिल्लीतील भाजपचे नेते कोणता निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागले आज.

हे ही वाचा:

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: मुंबईतील विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss