spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

विरोधी पक्षांच्या नेत्यांची अवस्था ही ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ अशी झाली आहे – Dada Bhuse

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे हिलाल माळी यांच्या आयोजित रक्तदान शिबिराला हजेरी लावली. यावेळी दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याच्या दिलेल्या नाऱ्यावर त्यांनी आत्मपरीक्षण करावे अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी यावेळी व्यक्त केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या स्वबळावरच्या नाऱ्यावर दादा भुसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून त्याबाबत आपण काय बोलणार असे म्हणत आमदारांची संख्या ही 20 वर आली आहे, तर खासदारांची संख्या ही 7 ते 8 वर आली आहे, त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करावे अशी टीका दादा भुसे यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्याच्या राजकारणात नवा उदय होणार असल्याची चर्चा सध्या विरोधकांकडून सुरू असल्याबाबत मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून सध्या काही जणांची अवस्था ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ अशी झाली आहे अशी स्वप्न पाहण्यावर कुठलीही बंधनं नाहीत अशी टीका दादा भुसे यांनी यावेळी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे निर्णय घेणार आहेत त्यामुळे ते जो निर्णय घेतील त्यानुसार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटला नसून पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे लवकरच निर्णय घेतील आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही करू अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी व्यक्त केले. मनोज जरांगे-पाटील यांनी आमरण उपोषण करू नये, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पीटिशन दाखल असून समाजाला आरक्षण देण्यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा : 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss