मला मुख्यमंत्री (Chief Minister) करा, प्रश्न चुटकीत संपवतो, कोल्हापुरात (Kolhapur News) संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) यांचं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Video Viral) होत आहे. संभाजीराजांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. सारथीच्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाच्या आंदोलन स्थळी उपस्थित राहत, संभाजीराजेंनी आंदोलकांची भेट घेतली.
मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत संपवतो, असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी गंमतीत म्हटलं आहे. कोल्हापुरात सारथीच्या विविध प्रश्नांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला संभाजीराजे यांनी भेट देऊन दिवाळीत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी आमचे प्रश्न सुटले, तर आम्ही आंदोलन मागे घेऊ असं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. त्यावर संभाजीराजे गंमतीत म्हणाले की, मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत सोडवतो. संभाजीराजेंचा हाच व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?
सारथी संशोधन फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांची संख्या पूर्वीप्रमाणे वाढवावी, तसेच पीएचडी नोंदणी दिनांकापासून फेलोशिप देऊन नुकसान टाळावं, यांसारख्या मागण्यांसाठी फेलोशिप विद्यार्थी तसेच सारथी कृती समिती कोल्हापूर विभागाचे प्राध्यापक सहभागी झाले आहेत. काल (रविवारी) या आंदोलकांची संभाजीराजे यांनी भेट घेतली. त्यावेळी संभाजीराजेंनी घेतलेली सारथी आंदोलकांच्या भेटीदरम्यान केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. आंदोलकांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली आहे. त्यावर समाजाचे सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपतींनी पुन्हा एकदा केलं आहे. या कामाचा पाठपुरावा करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
संभाजीराजेंकडून वक्तव्याचा पुनरुच्चार
संभाजीराजे छत्रपतींनी मला मुख्यमंत्री करा, चुटकीत प्रश्न सोडवतो, असं वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, संभाजीरांजेंनी हे वक्तव्य पहिल्यांदाच केलेलं नाही. यापूर्वीही बीडमध्ये मराठा आरक्षण जनसंवाद यात्रेत बोलताना संभाजीराजेंनी असं वक्तव्य केलं होतं.
हे ही वाचा :
दिवाळीला कुणाचा पत्ता होणार कट?विकेंड का वारला सलमान ऐश्वर्यावर भडकला
दिवाळी पाडवा कधी आहे? शुभ मुहूर्त आणि महत्व घ्या जाणून
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.