महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेमध्ये फिरण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या कृषीका ही यात्रेत गेली होती, यादरम्यान काही टवाळखोर मुलांनी तिचा पाठलाग केला आणि तिच्याबरोबर व्हिडिओ काढले, याबाबत शंका येतात सुरक्षारक्षकाने त्याच्या हातातील मोबाईल घेतला परंतु सुरक्षा रक्षकाबरोबर त्यांनी अरेरावे केली, या आधी देखील याच मुलांनी रक्षा खडसे यांच्या मुलीचा पाठलाग केल्याचं लक्षात आलं म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आज गुन्हा नोंदवण्यासाठी मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यामध्ये दाखल केला आहे. आज एका मंत्र्याची खासदाराची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य मुलींचे काय असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केला.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबाबत जो प्रकार घडला त्यावर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले,” मी या प्रकरणात स्वतः लक्ष दिले आहे. गुन्हा दाखल झालेला आहे. त्या टवाळखोर याला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतले असेल, बऱ्याच गोष्टी समोर येतील, जो यात दोषी आढळले जाईल त्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्या टवाळखोरांनी व्हिडिओ काढला, गार्डने त्यांना खाली आल्यानंतर हटकले होते. यापूर्वी त्या टवाळखोरवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी ही लोकं, माणसाच्या कळपातील विकृती आहेत यांचे चेहरे आता समोर आणली पाहिजे, काळी कपडे न घालता त्यांना आता जनतेसमोर आणले पाहिजे, ही विकृती कमी झाली पाहिजे, मुख्यमंत्री, आयोग, पोलीस नक्की दखल घेतली जाईल, मिडिया ट्रायल न करता,पोलीस कारवाई करत असतील तर त्यांना सहकार्य केले पाहिजे.
तर रोहिणी खडसे म्हणाल्या की,”महाराष्ट्रातल्या महिलांचा सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना या वाढलेल्या दिसत आहेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या व माझी भाची तिच्याबरोबर छेडखानीचा प्रचार दोन दिवसापूर्वी मुक्ताईनगर चेहरा लगत असलेल्या कोथळी या गावी यात्रेत घडला होता, दोन दिवसापूर्वी गुन्हा नोंदवून सुद्धा या टवाळखोरांवर साधी कारवाई देखील करण्यात आली नाही, माझा गृहमंत्री यांना एकच सवाल आहे की केंद्रीय मंत्र्यांच्या मुली बरोबर असला प्रकार घडत असेल तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य महिलांना न्याय कसा मिळणार असे प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिलाच प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्र्यांना स्वतःच्या मुलीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून तक्रार द्यावी लागत आहे यामुळे आता सिद्ध होते की महाराष्ट्रातील ग्रह खातं हे महिलांना सुरक्षा देण्यासाठी अपयशी ठरला आहे अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिली.
हे ही वाचा:
शिंदेंनी मोहन भागवत यांना आधी विचारावं ते कुंभमेळ्याला का गेले नाहीत – Sanjay Raut