मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे- पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला ४० दिवसांचा अल्टिमेटम आज संपलेलं असून, आजपासून त्यांच्या आंदोलनाचा दुसरा भाग चालू होणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते आजपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरंगे- पाटील यांनी केली आहे, या उपोषणादरम्यान पुढार्यांना आणि नेत्यांना गावबंदी करण्यात येणार असून प्रत्येक जिल्हा पातळीवर साखळी उपोषण यादरम्यान करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर सकाळी ११ वाजता जरंगे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत मनोज जरंगे नेमकी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
सरकारला थोडा वेळ देण्याची गिरीष महाजन यांची मागणी
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी आरक्षणासाठी सरकारला थोडा वेळ देण्याची विनंती जरंगे- पाटील यांच्याकडे केली आहे. मात्र,यावर जरांगे पाटील यांनी आता कोणालाही वेळ दिला जाणार नाही असं सांगितलं, सरकारने फार वेळ घेतलेला आहे. मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवला आहे एक महिन्यापेक्षा अधिक दिवस सरकारला दिले होते, हा वेळ त्यांनी स्वतः घेतलेला आहे, त्यामुळे आता वेळ देऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका जरांगे यांनी याबाबत घेतली आहे.
आरक्षण द्या मी उपोषणाला बसणार नाही
चार दिवसात कायदा पारित होत नाही म्हणून सरकारला वेळ द्या असं मंत्री गिरीष महाजन यांनी जरांगे पाटलांना सांगितलं,तसंच उपोषणाला बसू नका शरीराला ताण होईल असं देखील त्यांनी जरांगे यांना सांगितलं असता ,त्यावर जरांगे यांनी गिरीष महाजन यांना उत्तर देत, “मग आरक्षण द्या, मी उपोषणाला बसत नाही”, असं म्हटलं. कायदा पारित करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला होता आम्ही चाळीस दिवस दिले मग आता जास्तीचा वेळ कशासाठी पाहिजे? मराठा समाज म्हणून आम्ही त्यांना एक तासही वेळ देऊ शकत नाही. तुम्ही आज रात्रीच आरक्षण जाहीर करा असेही जरांगेंनी महाजन यांना सुनावलं आहे.
जरांगे यांची मराठा समाजाला आत्महत्या न करता लढण्याचं केलं आवाहन
जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आत्महत्या न करण्याची विनंती करत सोबत एकजुटीने लढू असं आवाहन केलं आहे. मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे आत्महत्या करू नका आरक्षण कसे देत नाही ते आम्ही पाहू, माझ्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी तुम्ही सगळे उभे रहा,माणसे कमी होता कामा नये.
हे ही वाचा :
Gaza साठी भारत बनला देवदूत, ३८ टन अन्नासह वैद्यकीय उपकरणे…
दसऱ्यानिमित्त Rakhi Sawant चा रावण लूक होतोय व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल